Posts

Showing posts from March, 2019

महिला दिन विशेष

अबला नही सबला है तू। नारी नही चिंगारी है तू ! स्री ही क्षणाची पत्नी अन अनंत काळाची माता असते. संसारात आई पत्नी,बहिण ,मुलगी म्हणून स्त्रीचे स्थान महत्वाचे आहे.  तरीही हजारो वर्षे भारतीय नारीचे स्वातंत्र्य एका समाज व्यवस्थेने हिरावून घेतल्यामूळे तिच्यासाठी प्रगतीच्या वाटा बंद  होत्या. परंतू महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या दांपत्याने १९ व्या शतकात समाज प्रबोधन करून स्री शिक्षणाची वाट मोकळी करून दिली.       उच्च शिक्षण,आधुनिक विचार बदलती जीवनशैली यामुळे आजची स्री ही सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. पुरूषांच्या बरोबरीने काम करत आहे .अनेक नवनवीन क्षेत्रे ज्यात फक्त पुरूषांची मक्तेदारी होती अशा क्षेत्रातही तिने मजल मारली आहे.    काही बाबतीत स्री पुरूष समानता दिसत असली,स्री स्वातंत्र्य दिसत असलं तरी अजूनही परिस्थिती पूर्णपणे बदलली नाही. आजही स्त्री कुठेच सुरक्षित नाही. स्त्रीयांना कायम दुय्यम समजले जाणार्‍या पुरूषप्रधान मानसिकतेला हा बदल अजूनही मान्य नाही. महिलांवर होणार्‍या अत्याचाराच्या मुळाशी ही मानसिकताच आहे. जोपर्यंत ही मानसिकता मूळापासून...

कविता

सावली सारखी सदा मागे राहीन तूझ्या तूला कधीच पडू देणार नाही! तूझ्यासाठी लढेन जगाशी सदा पण तूला कधीच रडू देणार नाही! सौ. मनिषा राजन कडव