वांगड्यानं येतयं...!!* *(मालवणी लघुकथा)*
*वांगड्यानं येतयं...!!* *(मालवणी लघुकथा)* "रे, तेका ताप इल्लो हा. तुमका चाकरमान्यांक कितेव सांगला तरी आपला ताच खरा? तुझी बायेल मुंबईतसून इल्ली हा, पण तू हयच येद्याचो केदो झालसं मा? तरी जळतो पाय जाळतलय पण मागे घेवचय नाय ह्या कसला म रे तुजा वागणा? अवसेचो चेडवाक घेउन गेल्लस झोळवूंक! आता भायरचा काय तरी बादला मगे रे?" दिगल्याच्या आवशीनं गाळीये घालुक सुरुवात केल्यान. मगे मुंबयकरीण बायलं घाबारली. तेना पण हरीकथा लावल्यान, "अहो ममडीला बराच ताप आहे हो. हे आतलं - बाहेरचं म्हणजे काय? औषध तरी आणा" आता काय सांगुचा? ८० साल ईला पण अजून रस्त्याक लायटी येवक नाय आसत. वालावलेत कोण मेलो डॉक्टर आणि केमिष्ट? कुडाळाक जावचा लागतला. "गो बायग्या, कुडाळातसून शेणाय मास्तराच्या दुकानातसून गोळीये हाडतय." दिगलो भैणीक हाळी घालून भायर पडलो. वालावलेतसून ४ वाजतानाचो लाल डब्बो पकडून दिगलो कुडाळात इलो. मगे बांबार्डेकर डॉक्टराकडून चिठ्ठी घेऊन, शेणाय मास्तराच्या दुकानात गेलो. थय औषधा घेई होतो तेवा पबल्या मांजरेकरान धबकल्यान," रे, कधी आयलं?, बायलेक आणि चेडवाक हाडहस मा? तुजा पयलाच चेडू! माव...