माय स्टोरी
माय स्टोरी . मूळ लेखक -- इनग्रिड बर्गमन आणि ॲलन बर्गेस , मराठी अनुवाद -- आशा कर्दळे प्रकाशक -- मेहता पब्लिशिंग हाऊस .....जगप्रसिद्ध स्वीडिश अभिनेत्री इनग्रिड बर्गमन हिचं हे गाजलेलं आत्मकथन. तीन वेळा ऑस्कर पारितोषिकं आणि तीन वेळा न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक्स अवार्ड्स मिळवणाऱ्या या सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीनं या पुस्तकात स्वत:ची पडद्यावरची कहाणी तर सांगितलेली आहेच; पण पडद्यामागची कहाणीही हातचं राखून न ठेवता, प्रांजळपणे सांगितलेली आहे.सिनेमा हा विषय मला अभ्यासाच्या दृष्टीने आवडतो. मी सिनेमे फारसे बघितले नसले तरी ते बनतात कसे हा माझ्या आवडीचा विषय आहे. हिंदी सिने सृष्टीतील राजेश खन्ना, रफी, हेमा मालिनी, ऋषी कपूर यांची आत्मचरित्रे / चरित्रे मी वाचली आहेत. मराठीत माडगुळकर, सुधीर फडके, मोहन जोशी, सचिन पिळगावकर यांची सुद्धा चरित्रे वाचलेली आहेत. हॉलीवूड अभिनेत्री इनग्रीड बर्गमन हीचे चरित्र सुद्धा एका आगळ्या कुतूहलाने वाचून काढले. इनग्रीड बर्गमन ही स्वीडिश अभिनेत्री 1920 ते 1960 हा काळ गाजवून गेली. सिनेमा व रंगभूमी , दोन्ही तिने चार दशके गाजवून सोडले. तिची आई लहानपणीच गेली तर वडील 13 व्या वर्षी गेले. ...