अभूतपूर्व अलाइव्ह
सदर पुस्तक उलगडताना करिता. अभूतपूर्व "अलाइव्ह " मुळ लेखक पीअर्स पॉल रिड लिखित व यांचा मराठीत अनुवाद केला आहे, अशोक पाथरकर यांनी या पुस्तकात विसाव्या शतकातील एक विलक्षण घटना म्हणून १९७२ साली अँडीज पर्वतावर झालेल्या विमान अपघाताची नोंद केली जाते. विमान अपघात ही काही आता अपरिचित वा अनोखी घटना मानली जात नाही. परंतु हा अपघात मात्र विलक्षण ठरला याचे कारण त्यातील प्रवाशांना अपघातानंतर तब्बल सततर दिवस त्या हिमाच्छादित पर्वताच्या भीषण थंडीवा-यात काढावे लागले. त्या पर्वतावर गवतही उगवत नाही. झाडेझुडपे नाहीत. शंभर फूटांपर्यंत बर्फाचे थर... काही प्रवासी अपघातानंतर लगेच मृत झाले, जे उरले त्यातील काहीजण जखमी... घायाळ... आजूबाजूला वस्ती नाही. गावही पन्नाससाठ मैल दूर. संपर्काचे साधन नाही. फक्त चार तासाच्या प्रवासासाठी निघालेल्या या विमानातील प्रवाशांजवळ खाण्यापिण्याच्या वस्तूही मोजक्याच होत्या. चॉकलेटस, चीज, वाइन, अँपल. सर्व फारच तोटके. या प्रवाशांनी मदतीसाठी वरून जाणाऱ्या विमानांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. सुटकेसाठी प्रयत्न करणा-या हेलिकॉप्टर्सचेही लक्ष आपल्याकडे जाव...