वृत्तपत्र सायबर क्राईम स्पर्धैसाठी

पाऊस
पाऊस तूझ्या माझ्या मनातला
पाऊस ह्रदयाला गारवा देणारा
पाऊस करपलेल्या मनाला शांत करणारा
हा पाऊस दिलासा देणारा

हा पाऊस आपल्या नात्याला ओलावा देणारा
मनात प्रेमाचे बिज अंकुरणारा
हा त्या अंकुरलेल्या बिजाचे
रोप बनवणारा फुलवणारा

तुझ्या माझ्या या नात्याला सिंचणारा
तुला माझी न मला तुझी ओढ भासवणारा
विरही मनालाही ऊबदार दिलासा देणारा
तसाच थंडगार शहाराही देणारा

तुझ्या माझ्या जीवनात हिरवळ आणणारा
कोसळून झाल्यावर आभाळ निरभ्र करणारा
हा पाऊस आल्हाददायक असा
तुझ्या माझ्या नात्याला समृध्द करणारा

सौ.मनिषा कडव
कल्याण

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*