भय इथले संपत नाही

*भय इथले संपत नाही*
आज कोरोना नावाच्या व्हायरसने पृथ्वीवर आहाकार मांडलाय. रोज बातम्यांमध्ये या कोरोनाच्या पेशंटच्या पाॅझीटिव्ह आकडा,मृत पेशंटचा आकडा ऐकून घराबाहेर पडावे की नको ही मनःस्थिती जिथे होते. रस्त्यावर रहाणारी मुलांना मात्र या नेसर्गिक आपत्तीची कल्पना नाही की भय नाही.
    तिथे मला बघून आश्चर्यच वाटले खरतरं माझ्या 
शाळेच्या समोर दरवर्षी जास्त पाऊस पडल्यावर पाणी साचते.  त्यादिवशी ही असाच भरपूर पाऊस पडत होता.   शाळेच्या समोर भरपूर पाणी साचले होते. आणी त्यात ती रस्त्यावर राहणारी पाच ते सहा वयाची ही मुले नैसर्गिक विधी करत होती . त्या घाण पाण्यात डुंबत होती , पोहत होती. मला ते सर्व पाहून अंगावर शहारे आले. मनामध्ये गलबलून आलं. मी माझ्या मुलांना या चार महिन्यात माझी मुलं मोठी असूनही साधं बिल्डींगच्या खाली जाऊ दिलं नाही.  मी प्रवासातून घरी गेले की आंघोळ करून स्वच्छ होऊनच. मी घरात वावरते. सतत डोक्यात हेच विचार असतात. मी प्रवास करते. यामुळे माझ्या मुलांना त्रास तर होणार नाही ना.
या मुलांकडे पाहिल्यावर सतत हाच विचार येतो. या मुलांच्या आईवडिलांना नाही का ही भिती वाटत असेल. पोहताना ते घाणेरडे पाणीही त्यांच्या पोटात जात होते. मग यांना नाही का त्रास होणार कोरोनाचा.  खरेतर माझे सगळे प्रश्न अनुत्तरित माझ्याकडेच आहेत . 
      असाच दुसरा प्रसंग मी रोज शाळेतून येताना सायन ते खोपट व खोपट ते कल्याण असा माझा रोजचा प्रवास असतो. तीन हात नाक्याच्या इथे जेव्हा सिग्नलच्या इथे बस थांबते. इतर प्रवाशांच्या गाड्या  तिथे सिग्नलला थांबतात तेव्हा चार पाच मूली चौदा ते पंधरा वयोगटातल्या प्रवाशांच्या गाड्यांजवळ येऊन पेसे मागतात. यातील काही मूली एका हाताने ओढणी मास्क म्हणून तोडांवर धरलेली असते तर काही मात्र बिनधास्त मास्क न वापरताच फिरत असतात. मला तर वाटते. जिथे पोटाला अन्न नाही. आणी ते मिळाल नाही तर आपण उपाशी मरणार. ते मिळवण्यासाठी घराबाहेर तर पडाव लागणारच. जिथे अंगावर घालायला कपडा नाही .तिथे नाकावर बांधायला मास्क कुठून आणणार. हा कोरोना काय करणार आपलं ही बेफीकीर वृत्तीच जणू त्यांनी बाळगली आहे.
       रोज मी शाळेत जाताना बसने प्रवास करते.  बसमधून प्रवास करण्यासाठी लाईनमध्ये उभे रहावे लागते. आज ट्रेनचा प्रवास बंद असल्यामुळे सर्व प्रवाशी यांचा ओढा बसकडे वळला आहे. यामुळे गर्दी होते. इथे कोणी सोशल डिस्टंन्स काहीच पाळल जात नाही. पोटासाठी सगळे कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी  प्रवास करत आहेत. या सर्वांना नाही का या आजाराची भिती.
      भिती तर सर्वाना आहे. पण कुटूंबाच पोट भरण्यासाठी यांनी या भितीवर मात करून घराबाहेर पडत आहेत. यांना बळ मिळतेय ते यांच्या कुटूंबाचे भुकेने व्याकुळलेले चेहरे पाहून.  नक्की हे कोरोनाचे भय आहे कोणाला. पांढरपेशाना, मध्यमवर्गियांना की सामान्यजणांना.
शेवटी काय तर
देव तारील
त्याला कोण मारील
सौ. मनिषा राजन कडव
कल्याण

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*