वाचाल तर वाचाल
प्रत्येकाची वैचारिक पातळी ही वेगवेगळी असते.
कोण पटकन कुठलिही गोष्ट मनाला पटकन लावून घेत. तर कोणी ऐकून ती गोष्ट तिथेच सोडून देत.
तर काही माणस समोरच्या व्यक्तीने आपल्याबद्दल मांडलेल मत हे पुर्णतः चुकीच आहे. भिन्न आहे. यावर लगेच वाद घालतात. वाद घालण चुकीचं आहे. परंतू गप्प राहून स्विकारण हेही चुकीचचं.
आपलं जर रोजच वाचनं असेल तर आपली विचार करण्याची पातळी दिवसेंदिवस बदलतं जाते. आपला समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतं जातो.
नियमित थोडं का होईना वाचन करायलाच हवे.
सध्या मी सावरकर वाचतेय.
आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीच चरित्र वाचतो. तेव्हा त्याच्या स्वभावाचे पैलू काही काळ असेना आपल्या मनात घर करून राहतात. खुप प्रभाव पडतो आपल्या जीवनावर त्यांचा. पण आपण कुठल्याही पुस्तकातुन चरित्रातून किती घ्यायचे किती सोडायचे किंबहुना आत्मसात करायचे हे आपल्यावर असते.
पुस्तके ही आपल्या विचारांची मनाची जडणघडण करत असतात.
तारा बनारसे यांच शामिनी वाचल्यावर माझ्या मनात शुर्पनखा विषयीचा जो किल्मीश जळमट मनात होता तो दूर झाला. मन तिच्या भुमिकेत जाऊन विचार करू लागलं. आणी रामायण पाहिल्यापासून वाचल्यापासून जो पुर्ण रामायण तिच्यामुळे घडलं. ती वाईट होती हा दृष्टीकोण माझा होता. तो पुर्णपणे बदलला. त्याचप्रमाणे मी नेपोलियन बोनापार्ट वाचलं . नेपोलियन माझ्यासाठी एवढ मार्गदर्शक ठरलं की मी नेपोलियनला माझा गूरूच मानला. तेव्हापासून माझ्या आचरणात आयुष्यात जे काही बदल घडले ते या नेपोलियन पुस्तकामुळे.
याचप्रमाणे हिटलर बाबतही झालं. इतरांचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन जरी वेगळा असला तरी मी जेव्हा हिटलर बद्दलचं नाझी भस्मासुराचा उदयास्त हे पुस्तक वाचल तेव्हा त्याच्या व्यक्तीमत्वामुळे मी भारावून गेले आणी हिटलर विषयी अधिकाधिक माहिती मिळावी म्हणून त्याच्याविषयी जे काही मिळेल ते मी वाचत गेले. त्यातून मला जो हिटलर गवसला. तो फारच वेगळा होता. त्याने त्याच्यावर झालेल्या त्यांच्या जमातीवर झालेल्या अन्यायाची परतफेड करण्यासाठीच त्याने हे युध्द पुकारल होतं. हे काम हाती घेतलं होत.
हिटलर शिस्तप्रिय होता.
त्याच्या स्वभावातील हे काही पैलू मला भावले. त्याची पुस्तके वाचल्यावर मी त्याच्या स्वभावातील
भावलेले गुण आत्मसात केले.
अशीच या काही पुस्तकांचा पगडा खरचं आपल्या जीवनावर कायमं रहातो. कायमस्वरूपी हे आपल्या मनात घर करुन राहतात.
अशी मी अनेक पुस्तके वाचलीत. आज याच वाचनामुळे मी या स्थानावर आहे,आज मी ही जे काही लिहितेय माझे विचार मांडतेय ते या पुस्तकांमुळेच
म्हणून एवढेच सांगावेसे वाटतेय
' वाचाल तर वाचाल '
💐💐💐
ReplyDelete