कोसबाडच्या टेकडीवरून परिक्षण
*कोसबाडच्या टेकडीवरुन* *--अनुताई वाघ* (आत्मचरित्र)
*ऋचा प्रकाशन*
*पाचवी आवूत्ती* :-१ मार्च २००८
*किमंत*:- १६० रुपये
" मनाला निराश करुन टाकणाऱ्या सभोवतालच्या परिस्थितीत अनुताईंसारख्या कार्यकर्त्या अशी कुठली प्रेरणा मनात जिवंत ठेवून काम करीत राहतात ते मला कळत नाही . वास्तविक त्यांच्यापुढे आपण कस्पटासारखे आहोत असेच वाटते." या पु.ल .देशपांडे यांच्या मलपूष्ठावरील भावना वाचल्यावर आपण जिज्ञासेने हे पुस्तक वाचू लागतो. १९१० ते १९९२ या कालावधीमध्ये केवळ माणूस म्हणून काल व्यतीत न करता आपल्या आजूबाजूची सूष्टी अधिक सुंदर अधिक बलशाली कशी बनवता येईल यासाठी धडपडणार एक व्यक्तीमत्व म्हणजे अनुताई वाघ आनंदाचे डोही ..आनंद तरंग याब्रीदने अशोक चिटणीस यांनी या पुस्तकात लिहिलेली दीर्घ प्रस्तावना अनुताईंचा जीवनपट अतिशय सहजपणे वाचकांच्या मनाला स्पर्श करुन जातो. वयाच्या तेराव्या वर्षी बालविधवा झालेल्या अनुताई यांच स्वतःच्या आयुष्याच सिंहावलोकनच म्हणाव लागेल . अनुताई आणि ताराबाई मोडक यांच गुरुशिष्याच नातेसंबधातही पुस्तक वाचताना अनेक महत्वपूर्ण गोष्टी लक्षात येतात. ताराबाई व अनुताईंच्या संदर्भात अशोक चिटणीस एका ठिकाणी लिहितात. प्रत्येक लहान मुलात एक मोठा माणूस असतो. प्रत्येक मोठ्या माणसात एक लहान मुल असतं त्याप्रमाणे प्रत्येक महान स्त्रीत एक पुरुष असतो आणि प्रत्येक महापुरुषात एक स्त्री दडलेली असते. असं मला वाटत नियमांची तत्वांची अंमलबजावणी करणाऱ्या अनुताई यापुरुषी असतात. त्यामुळेच ताराबाई यांना आपला मुलगाच मानत . त्या अनुषंगाने अनुताई व ताराबाई यांच्यातील अनेक प्रसंग पुस्तकात वाचावयास मिळतात. काही माणसांच व्यक्तीमत्व असं असत की एखादी भावना अनुभविण्याची शक्ती आपल्यात आहे. याचा प्रत्यय तिच आपल्याला आणून देतात. आणि आपलच दर्शन आपल्याला नव्याने घडवतात. अशा भावना स.ह.देशपांडे यांनी पुस्तकाच्या जीवंतिका या अनुभव लेखाव्दारे व्यक्त केलेल्या आहेत. त्यांनी अनुताई वाघ यांच्या शैक्षणिक कार्य संदर्भातल्या अनेक घटना अतिशय कमी शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एखाद्या व्यक्तीच जीवनकार्य प्रत्यक्षपणे पाहता अनुभवता येण ही एक अनुरुप संधी म्हणावी लागेल. ही संधी देशपांडे सरांनी ओळखून.अनुताई वाघ यांच अनुभव विश्व आपल्या लेखणीव्दारे केले आहे.
कोसबाडच्या टेकडीवरून हे पुस्तक नाहीतर एक अमूल्य शैक्षणिक दस्ताऐवज म्हणावा लागेल . केवळ या पुस्तकामध्ये विद्यार्थी - समाज व त्यांच्या अंतर्गत अनुताई वाघ यांनी केलेल्या वेगवेगळ्या घटना नसून त्या कालाच्या ओघात निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर मात करून इतिहास निर्माण करणारे कार्य आहे. एखाद्या क्षेत्रात झोकून देऊन सतत कार्यमग्न रहाण हे सर्वानांच शक्य होता त नाही . वारल्यांना स्वतःविषयी वाटणाऱ्या "नगण्य " पणाच्या भयगंडातून मुक्त करणे हाच सर्वात महत्वाचा प्रश्न अनुताई वाघ यांनी आपल्या मातूह्दयाने त्यांना आपलसं.करुन आदिवासींच्या पोराबाळांना समूध्द करण्याचा प्रचंड प्रयत्न केला व तो यशस्वी करून दाखवला. आयुष्यात असा केव्हातरी काळ येतो की मागे वळून पहावेसे वाटते अगदी दूरचेही अनपेक्षित स्पष्टपणे दिसायला लागते मोतीबिंदूने अधू केलेल्या माझ्या डोळ्यांनांही दूष्टी येते व प्रसंग ,आठवणी, व्यक्ती डोळ्यासमोर उभ्या राहतात. त्या आठवणींचा तसा क़म नसतो. जे जसे घडले ,आठवले दिसले ,तसे दाखवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न या पुस्तकामध्येच आहे. वयाच्या ५१ व्या वर्षी बी.एड झालेल्या अनुताई वाघ या सध्याच्या तरुणांसाठी एक आदर्श उदाहरण आहेत. पुस्तकाच्या सुरुवातीच्या टप्यामध्ये अनुताईंनी स्वतःच्या बालपणातील वेगवेगळ्या घटना व गुपित व्यक्त केलेले आहेत.
बोरीवली शिबीर ते बोर्डी यादरम्यानचा प्रवास त्यांनी वेगवेगळ्या स्फूटलेखनाव्दारे व्यक्त केलेला आहे. ताराबाईंचा इतिहास मध्यवर्ती भागात वाचायला मिळतो .१९३९ साली गिजूभाई बधेका यांच निधन झाल व त्यांच्या निधनामुळे होणारे दुःख ही अनुताई व्यक्त करतात. महात्मा गांधींच्या त्रिसूत्री कार्यक्रमाव्दारे अनेक प्रयोग ही करतात. प्राथमिक शाळांविषयी बालअध्यापन मंदिर ,ग्राम बालशिक्षा केंद्र , बालवाडी ची संकल्पना याविषयीचे वाचन भारावून टाकणारे आहे. आदिवासींची मुले नागरी संस्कृती पासून दूर होती . पण निरागस होती . डोळ्यात चमक ,चपलता ,समयसूचकता , काटकपणा हे गुण लक्ष वेळ धून.घेणारे होते . त्यांच्याविषयी अनुताई वाघ म्हणतात.
भित नाही वाघाला
भित नाही सिंहाला
भितो तो एक पांढऱ्या कपड्याला.
आमच्यासारख्या शिकल्या सवरलेल्या माणसांची आदिवासींना भिती वाटायची . हे वाचून अंतर्मुख झाल्याशिवाय आपण राहत नाही. अनुताईंनी मुलांवर केलेले वेगवेगळे प्रयोग यामधून वाचायला मिळतात. प्रशिक्षण योजना असेल किंवा विकासवाडी अध्यापक विद्यालय असेल तिथे येणाऱ्या अडचणी आणि नवनवीन संकल्पना अतिशय सोप्या शब्दात मांडल्या गेल्या आहेत. "कुरणशाळा" ही तत्कालीन परिस्थितीला धरून मुलांना शाळेची आवड निर्माण करण्यासाठी केलेली प्रयोगशाळा होय तिची स्वयंभू शाळा व त्या संदर्भात घडलेल्या घटना ही अनुताई वाघ यांनी सहजसोप्या पध्दतीने मांडल्या आहेत. आदिवासींमध्ये काम करीत असताना त्यांच्या दैनंदिन जीवनातील वेगवेगळ्या घटना वेगवेगळे अनुभव अनुभवणे व त्यांच्या जीवनप्रणालीशी एकरुप होणे . हे किती महत्वाच असत हे अनुताई वाघ यांचे आदिवासींच्या सोबत घालवलेल्या वेगवेगळ्या प्रसंगाचे वाचन करताना लक्षात येत. या आदिवासींच दैनंदिन जीवन.देव धर्म निसर्गाप्रतीच्या असलेल्या भावना या जाणून घेतल्यामुळेच अनुताई वाघ यांना काम करताना आदिवासींनी आपलस मानल याकालावधीत वेगवेगळे लेखन त्यांनी केल .पुढे त्या संपादिकासुध्दा झाल्यात "शिक्षणपत्रिका" हे त्यांच आवडत मासिक होत .आणि ३५ वर्षे सातत्याने त्यांनी शिक्षणपत्रिकेत लेखन केल . हे त्या आवर्जुन सांगतात. केवळ मासिकात लेखन न करता स्फूटलेखन ,कविता, गोष्टी ,बडबडगीते, वाचनपाठ असं कितीतरी लेखन अनुताईंनी केल.
कोसबाडच्या टेकडीवरून काम करीत असताना अनुताईंच्या हाती लागलेली शिक्षणसुत्रे म्हणजे विकासवाडी कुरणशाळा ,पढाई-कमाई साधने , व्यवसाय शिक्षण हवे , रात्रशाळा ,जीवनशिक्षण यांची सांगड हवी ,मुले आपलीशी कशी करावी , अभ्यासक्रमात लवचिकता हवी प्रकल्प आणि पुढे ग्राममंगल संस्थेची स्थापना असे कितीतरी शिक्षणसुत्र एकाच माध्यमातून आपल्याला पुढे इतिहास स्वरूपात मार्गदर्शक ठरतात. वेगवेगळ्या स्वरुपातून सहज शिक्षण कसं.द्याव याचे वस्तुपाठ अनुताई वाघ यांनी दिलेले आहेत. या कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने आदर्श शिक्षक पुरस्कार ,दलित मित्र म्हणून सन्मान केंद्र शासनातर्फे पद्मश्री पुरस्कार , दिनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे आशा भोसले पुरस्कार ,रमाबाई केशव ठाकरे पुरस्कार असे अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याचा उल्लेखही पुस्तकात वाचायला मिळतो.
○आपल्याला पडणारे प्रश्न निर्भयपणे विचारता येण आणि दिसलेल सत्य निर्भयपणे सांगता येण ,संवादातून आपली आज उमज आपण वाढवण म्हणजेच भयमुक्त शिक्षण होता य अशा पध्दतीच सर्वागिंण शिक्षण "कोसबाडच्या टेकडीवरून" या पुस्तकात वाचायला मिळत त्याचा आदर्शपाठ शिक्षक पालक यांनी घ्यायला हरकत नाही , शिक्षणक्षेत्रात येऊ पाहणाऱ्या प्रत्येकांने ही पुस्तक वाचलच पाहिजे.
छान लिहिले, शिक्षण क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांसाठी माहितीपूर्ण व वाचनीय असे आत्मचरित्र आहे, शुभेच्छा💐💐💐
ReplyDeleteछान लिहिले, शिक्षण क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांसाठी माहितीपूर्ण व वाचनीय असे आत्मचरित्र आहे, शुभेच्छा💐💐💐
ReplyDelete