जाणीव
आपण आपल्या जवळच्या व्यक्तीना त्यांच दुःख पाहून आपलं ह्रदय द्रवत आणी मदत करायला जातो. त्यांना आपल्याकडून मदत मिळेपर्यंत अशा व्यक्ती अगदी आपण त्यांचे देवदूत आहोत असे भासवत डोक्यावरच घेतात. आणी या आनंदाच्या नादात आपण त्यांना सल्ले देतो. इथे त्यांच मात्र सगळं चांगलं होत असतं. आपलं मात्र आपल्या घराकडे दुर्लक्ष होत असतं. कळस तर तेव्हा होतो. जेव्हा जेव्हा आपल्याला मदतीची गरज भासते . आपण सदर व्यक्तीकडे मदत मागतो. यावेळी सदर व्यक्ती सरळ सांगतात माझ्याकडून कोणत्याही मदतीची अपेक्षा ठेवू नका. आपण निराश होतो, तरीही आपली रग( चरबी ) कमी झालेली नसते. आपण अशा व्यक्तीला आपल्या जिवनातील एक भागच समजलेला असतो ना? थोडसं जरी त्या व्यक्तीच्या घरी खटकलं , काय झालं आपण त्यांंना सल्ले द्यायला लागतो. इथेच गंमत होते. समोरील व्यक्तीला आता आपले सल्ले नकोशे झालेले असतात. कारण एकतर आपण त्या व्यक्तीच्या आयुष्यातील अविभाज्य घटक नसतो. दुसर कारणं फक्त त्याच आयुष्य सुधारण्यासाठी म्हणूनचं ती व्यक्ती आपल्या जवळ आलेली असते. म्हणूनच ती आपल्याला सरळचं आपल्या स्वभावातील सगळे दोष दाखवायला सुरूवात करते. म्हणूनच मदत एवढीच करायला हवी. जेवढी आपल्याला सोसेल. अकारण मदत कोणाला करायला जाऊच नये. दुसरी
गोष्ट मदत करून अशा व्यक्तींपासुन लांबच निघून जावे. गुंतून राहू नये. आपलं काय चुकलं याची खंत आपल्याला टोचत राहते, एक अपराधी पणाची बोचरी जाणीव सतत आपल्याला होत राहते. कारण याचा मानसिक त्रास आपल्याला आयुष्यभर रहातो.
तुम्ही अशा लोकांचा विचारचं मनातून काढून टाका.
आणी स्वतःची होणारी चिडचिड थांबवा. अशा लोकांपासून खुप दूरदूर निघून जा. संपर्कच तोडून टाका. तरच तुम्हाला होणारा त्रास थांबेल. तुम्ही काय गमावलं आणी काय कमावलं याचा विचारचं सोडून द्या.
कारण बुध्दीबळ खेळून झाल्यानंतर राजा आणी इतर सोंगटे यांना एकत्रच ठेवायचं असतं. तसचं आयुष्याचं आहे. ते संपल्यावर सगळ्यांना एकाच ठिकाणी जायचं असतं.
गुंतलेल्या मनाला वेळीच आवर
आता तुच स्वतःला स्वतः सावर
सौ.मनिषा राजन कडव
सहमत
ReplyDelete