रोजच्या जीवनातील जगण्याची धडपड
*रोजच्या जीवनातील जगण्याची धडपड*
रेल्वे बंद आणी सुरू जीवघेणा प्रवास. लाॅकडाऊन सुरु झाली आणी ट्रेन बंद झाल्या. वर्क फ्राॅम होम सुरू झाले. पण वर्क फ्राॅम हे तर फक्त ज्यांच्या कामाशी काॅम्प्युटरचा संबंध आहे. अशांसाठी. पण ज्यांच काम ते स्वतः तिथे हजर राहिल्याशिवाय होऊ शकत नाही. अशा लोकांचे मात्र काम नाही तर पैसा नाही. अशा लोकांची मात्र उपासमारीची पाळी आली.
लाॅकडाऊनच्या या काळात अत्यावश्यक सेवा वाल्यांना मात्र बससेवा रेल्वेसेवा चालू होत्या. आणी खरोखरच ते आवश्यक होते. हळूहळू लाॅकडाऊन शिथील होत गेले. आणी बससेवा चालू झाल्या आणी लोक हळूहळू बाहेर पडू लागले. मी ही माझ्या कामावर बसने जायला लागले. बसने जाता येताना खरोखर रोज एक नवा अनुभव मिळतो. कालच शनिवारी मी सायन वरून घरी येण्यासाठी बसमध्ये बसले. बस चालू झाली . कुर्ल्याच्या पुढे निघाली. बस मध्ये स्टाॅपवर थांबत होती. हायवेवरून बस जाताना चेंबुरच्या स्टाॅपवर बस थांबली . काही माणसं बसमध्ये चढली . कंडक्टरने बसची घंटा वाजवली आणी बस चालू झाली. बस चालू झाली असताना. एक वयस्कर गृहस्थ धावत बस पकडत होते. त्यांनी बस पकडली ही . पण.......अचानक एका क्षणात त्यांचा पकडलेला तो एक हाथ सुटला आणी ते गृहस्थ अक्षरशः खाली पडले. नेमकी मी दरवाज्या बरोबर समोरच्या सीटवर बसले होते. हे दृश्य पाहून अक्षरशः अंगावर काटा आला आणी मी जोरात किंचाळले. कंडक्टरने बेल वाजवल्यावर बस लगेच थांबली. सर्वांना एकच काळजी होती. की ती व्यक्ती बसच्या मागील चाकाखाली आली नसेल ना. बस थांबल्यावर सगळे सोशल डिस्टेंस विसरून त्या व्यक्तींना पहायला बसच्या खाली उतरले. ती व्यक्ती बेशुध्द पडली होती. त्यांच नशीब बलवत्तर म्हणून बसच्या चाकाखाली आली नव्हती. पाठीवर पडल्यामुळे डोक्याच्या मागच्या बाजूला लागल्यामुळे बेशुध्द नत्र होते. हातातला डबा,पाण्याची बाॅटल आणी पिशवीतील सिताफळ इतस्ततः विखुरले होते. खरतर चालती बस पकडायला गेल्यामुळे आणी वजन जास्त असल्यामुळे तोल संभाळता न आल्यामुळे ते पडले होते. पण स्थानीक लोकांनी मात्र कंडक्टरवर घसरायला सुरूवात केली. कंडक्टरला वेठीस धरले गेले. कंडक्टर समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण कोणी ऐकून घेत नव्हते. शेवटी बसमधल्या लोकांनी मध्ये पडून हा वाद मिटवला. या दरम्यान काही बस मधल्या लोकांनी त्या माणसाला पाणी तोंडावर मारले. पाणी पाजले. या कोरोनाच्या साथीतही ही माणूसकी मात्र दिसली. काही स्थानीक लोकांनी रिक्षा थांबवून त्या प्रौढ व्यक्तीना रिक्षामध्ये बसवून दिले.
घरी जाण्यासाठी घाई करणार्या चालती बस पकडण्याची घाई करणार्या त्या काकांच्या कपड्यांवरून ते सामान्य घरातील वाटले. खरोखर त्या रिक्षाचे पेसे त्यावेळी त्यांच्या खिशात तरी असतील का? असा प्रश्न मनात आला? असते तर त्यांनी आधीच नसती का रिक्षा केली असती. मला मनातून खुप वाईट वाटल . मी हे सगळ मात्र लांबून पहात होते. पण मला पुढे जायची हिमंत झाली नाही. त्याक्षणी मी मागे का राहीले. कशाची भिती वाटली मला . हा माझा मलाच पडलेला प्रश्न. राहून राहुन एकच वाटतय . हे जे काही चाललय ते कलिसुगाचा प्रारंभ आहे की अंत
पावसामुळे नदीला येणारे पुर, होणारे बाँम्बस्पोट,कोवीडसारखे बळावणारे आजार.हे सर्व पाहून असं वाटायला लागलं आहे . श्रीकृष्णाने अश्वत्थामा जे कलियुगाच्या अंताबद्दल सांगीतले होते तो अंत आता जवळ तर आलेला नाही.
सौ. मनिषा राजन कडव
वास्तविक अनुभव कथन, छान लिहिले शुभेच्छा💐💐
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete👌👌
ReplyDelete