डिजीटल वाचनालय
डिजीटल कथाकथन सादरीकरण
डी.एस.च्या वाचनालयाचे
आॅनलाईन तास घ्यायचे ठरले
कथासादरीकरण करायचे असे
सगळ्यांच्या मनाने हेरले।।१॥
चलरे भोपळ्या टुणूक टुणूक ही
कथा घ्यावी असा ठरला बेत
संगीताची मूले मध्येच सूर लावतील
कथेला पार्श्वसंगीत देत ॥२॥॥
पात्रे ठरली दिवस ठरला
सगळे ठरले खास
उद्या काय होईल तासाला
मूलांना लागला ध्यास॥॥३॥॥
झूम मिटींग होता सुरू
पात्रे कोण कोण हे मॅडम लागल्या बघू
करता करता भेटले वाटेकरू
विद्यार्थी एकत्र झाले सगळे होते अभ्यासू।।४।।
झूमवर कथा सादरीकरण झाले सुरू
नी गर्दी लागली वाढू
म्हातारीची एंट्री झाली नाही तरी
वाघ मात्र लागला डरकाळी फोडू॥५॥
लांडगा आला वाघ आला
मोठमोठ्याने आवाज करत
शांत स्तब्ध सारे झाले
कथाही होती पुढे सरकत ।।६।।
म्हातारी चालली लेकीकडे हा कथेचा भाग
झुमच्या माध्यमातून सुरू झाला
वाघाची एंट्री होताच
म्हातारीने स्वतःचा कॅमेरा आॅफ केला॥७॥॥
झुमवरचे वाचनालयाचे तास
मुलांना फार आवडले
शाळा बंद असली तरी
आमचे वाचनाचे तास नाही थांबले॥८॥॥
सौ.मनिषा राजन कडव
ग्रंथपाल,डी.एस.हायस्कूल,शीव
छान कविता लहानपण आठवले ,शुभेच्छा💐💐
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteमस्त सुंदर 👌
ReplyDeleteडिजिटल वाचनालय कविता मस्त च👍 u. K. Dupare
ReplyDelete