सामाजकीकरण

आज खरच मनापासून वाटत.   पुर्वी जी एकत्र कुटूंब पध्दती होती .ती योग्यच होती. आईवडील दोघे घराबाहेर असले तरी लेकरांची काळजी घ्यायला घरात जबाबदार व्यक्ती होत्या.त्यांच्यावर चांगले संस्कार व्हायचे.  थोरामोठ्यांचा मान राखायला शिकवले तर जायचेच . पण त्याचबरोबर पानात वाढलेल्या सर्व वस्तूही खायला शिकवले जायचे.  आपल्याला मिळालेल्या वस्तूचे शेअरींग करायला वेगळे शिकवावे लागत नव्हते.  मुले एकत्र वाढत असल्याने ते आपोआपच होत होते.  शिवाय त्यांच्यामध्ये जिव्हाळाही आपोआप निर्माण होत होता. तुझे माझे न होता आमचे हा शब्द नक्कीच होता.  
  आज जीथे सर्वच क्षेत्रात सामाजकीकरण होत आहे . तीथे आता खरचं एकत्र कुटूंब पध्दतीची नक्कीच उणीव भासणार आहे. कारण मुंबई सारख्या शहरात जीथे महागडी घरे परवडत नाही. अशावेळी लोक उपनगरांचा आधार घेत आहेत. पण अशावेळी मग त्यांना प्रवासासाठी घरातून लवकर बाहेर पडावे लागत आहे. विभक्त कुटूंब पध्दतीमुळे मुलांजवळ घरी  कुणी नाही अशावेळी दहा दहा तास मुले पाळणाघरात घालवत आहेत.  आईवडिलांचे प्रेम मुलांना फक्त काय ते सुट्टीच्या वेळीच मीळत आहे. जीथे स्वयंपाक करायला वेळ मिळत नाही .  तिथे फास्ट फुडचा आधार घेतला जात आहे.  त्यामुळे मुलांच्या आरोग्याकडेही आपोआपच दुर्लक्ष होत आहे.  मुलांना शिकवायला वेळ नाही म्हणून क्लासेसचा आधार घेतला जात आहे, या सर्व गोष्टींमुळे मुले जास्तीत जास्त वेळ घराबाहेर आज आहेत. या सर्व बाबींचा विचारच केला जात नाही. मुलांच्या क्लासेसची फी ,शाळेची फी  , पाळणाघराचे पैसे असे इतर देणी देण्यासाठी जास्तीत जास्त पैसे कमावण्यासाठी जास्त वेळ आईवडीलांंना घराबाहेर रहावे लागत आहे.  यामुळे आपले आपल्रा मुलांकडे दुर्लक्ष होत आहे.  हे पालकांच्या लक्षातच येत नाही.  त्यांच खाण पिणं पेहराव याकडे आईवडिलांच लक्षचं नाही.  किंबहुना मुलांचे आजचे वागण्यामध्ये फरक जाणवतं आहे याला काही अंशी आईवडीलच जबाबदार आहेत. हे त्यांना उमगतच नाही.  याउलट एकत्र कुटूंब पध्दती असती तर तुमचा वर्कलोड कमी झाला असता. एकत्रीत जेवण बनवलं गेल असत .  त्यामुळे मुलांना घरचे चार घास गरम मिळाले असते. वाण्याचे सामान एकत्र आले असते.त्यामुळे पेसे कमी लागले असते. घरची कामे विभागली गेली असती. मुलांमध्ये एकमेकांशी जमवून घेण्याची वृत्ती वाढली असती. एकत्र अभ्यास झाला असता. पाळण्याघराची गरज भासली नसती. मुलं घरी लवकर नाही आले. तर घरातील व्यक्तींचे लक्ष राहिले असते.  अशा आणी कितीतरी गोष्टी घडल्या असत्या  पण आपल्याला या गोष्टीत रसच उरलेला नाहीय.  पण आता नक्कीच उणीव भासेल....
सौ.मनिषा कडव

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*