मराठी दिन
*मराठीच बोलू कवतूके तेव्हाच*
आपल्याकडे २७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन म्हणून पाळला जातो. कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हे त्याचे निमित्त असते. परंतु वस्तूस्थिती अतिशय विपरित आहे. राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनाचे कामकाज मराठीतून चालले किंवा महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा मराठी भाषेतून चालवली गेली ,याचा अर्थ ती राजभाषा ठरली असे समजायचे कारण नाही .आज महानगरपालिकेच्या सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या इमारत विभागामध्ये इंग्रजी फाईलीशिवाय दुसरे काहीच सापडणार नाही. कारण यांचे प्रमुख म्हणून येणारे लोकही अमराठीच असतात. राज्य सरकारच्या सचिवांमध्ये ५० टक्कयांपेक्षा जास्त अमराठी सचिव असतात. ते सामान्य माणसाची मातूभाषा कुठली आहे याला महत्व देत नाहीत. तर त्यांना कुठली भाषा सोयीची आहे , याला त्यांच्या दूष्टीने अधिक महत्व असते. मातूभाषेचा अभिमान बाळगणे आणि तिचा अधिकाधिक वापर होणे या दोन्ही गोष्टी सारख्याच महत्वाच्या आहेत. केवळ पोकळ भाषणबाजी न करता मराठी चे संवर्धन करण्याची आत्मियता निर्माण झाली पाहिजे . याकरिता राज्यकर्ते मराठी अभिमानी असणे गरजे ठरते.
प्रत्येक देशाला किंवा तिथल्या जनसमुहाला स्वतःची एक मातूभाषा असते. तिचा आधार घेऊन शिक्षण किंवा विविध प्रकारचे व्यवहार पार पाडले जातात .जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत आपली साथसंगत करणारी किंवा जिच्या सहाय्याने आपले व्यक्तीमत्व विकसित करता येणारी भाषा म्हणून तिला मातूभाषा म्हटली जाते.जगमध्ये वेगवेगळ्या मातूभाषा बोलल्या जातात. जगाचा विचार केला तर सर्वाधिक म्हणजेच ९७ कोटी लोक चिनी भाषा बोलतात.तर ४८ कोटी लोक इंग्रजी भाषा बोलतात. तर ४४ कोटी लोक हिंदी भाषा बोलतात. आज जगात इस्लामिक देशांची संख्या जास्त असली तरी त्यांच्या भाषांमध्ये समानता नाही. आणि म्हणूनच लोकसंख्येच्या दूष्टीने दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारतातील हिंदी भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण बरेच मोठे असल्याचे दिसून येते.य तला आणखी सर्वेक्षण झालेला भाग असा असा आहे की, कोणत्याही भाषेतील ८००शब्द माहिती झाले, तर ती भाषा अवगत करता येते. आणि असा होता एक दावा केला जातो की , य ८००पैकी ३०० शब्द इंग्रजी असतात.जे सहजपणे तोंडवळणी पडलेले असतात. कालमानानुसार ते शब्द रुढ झाल्यामुळे त्यांचा दैनंदिन जीवनामध्ये सहजणे वापर होतो. अशाही परिस्थितीत जे विकसित देश आहेत ,त्यामध्ये रशिया ,जर्मनी ,फ़ान्स, जपान याठिकाणी अधिक आग्रहपूर्वक तेथील मातूभाषेतूनच शिक्षण दिले जात. या देशांमध्ये इंग्रजी ऐवजी स्थानिक मातूभाषेलाच महत्व देण्यामागची दोन महत्वाची कारणे आहेत .एक म्हणजे त्यातून निर्माण होणारे राष्ट्रीय व सामाजिक संस्कार आणि दुसरे म्हणजे मातूभाषेच्या शिक्षणातून विकसित होणारे सर्वागिंण व्यक्तीमत्व अर्थातच हे दुसऱ्याही एका सर्वेक्षणातून पहावयास मिळते. मातूभाषेतून शिक्षण घेतलेल्यांची गुणक्रमवारी ही उत्तम दर्जाची असते . म्हणजेच ग्रहणशक्ती ही उत्तम दर्जाची असते .म्हणजेच ग्रहणशक्ती किंवा समजशक्ती याची मोठी देणगी मातूभाषेच्या शिक्षणातून होते .हीच मातूभाषा खऱ्या अर्थाने संस्कृती आणि इतिहासाची वाहक ठरते. यावरुनच मातूभाषेच महत्व अनन्यसाधारण आहे हे वेगळे सांगायला नको .अशा परिस्थितीत भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या हिंदी भाषेचा आणि आपल्या महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेचा आग्रह धरला जाणे किती अनिवार्य आहे ही देखील स्पष्ट होते.
ज्या महाराष्ट्राची मातूभाषा मराठी आहे , तिची काय अवहेलना होते हे आपण अनेक ठिकाणी पाहतो .बंद पडणाऱ्या मराठी शाळा ,व्यवसाय नोकरीमध्ये होत असलेली मराठी भाषकांची पिछेहाट किंवा मुंबई सारख्या आंतरराष्ट्रीयदूष्ट्या महत्व असलेल्या महानगरीत घसरत चार ललिता ला मराठी माणसाचा टक्का या सर्वच गोष्टी महत्वाच्या ठरतात. मुंबईत निवडणूकीत होत असणारे मतदान आणि मातूभाषा मराठीचे योगदान असा जर विचार करायचा झाला तर केवळ भाषाच नव्हे तर मराठी माणसाच्या मुंबईतील अस्तित्वाविषयीसुध्दा शंका चिंताजनक परिस्थिती असल्याचे पहायला मिळते. मराठी माणूस आपले व्यवसायसुध्दा टिकवू शकत नाही , अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाषेकडे होणारे दुर्लक्ष हे सामाजिक ,राजकीय आणि सांस्कृतिकदूष्ट्या अत्यंत धोकादायक ठरत असतात. आणि याकरिताच अनेक देशांमध्ये राज्यकर्ते निवडताना तेथील मातूभाषेवर प्रेम करणारे राज्यकर्ते निवडले जातात.
मराठी बोलू कवतुके केव्हा आम्ही मनापासून म्हणू जेव्हा ती येथील अर्थव्यवहाराची भाषा होईल तेव्हा . तो इंग्रजीत बोलला वा ती हिंदीत बोलली म्हणून मी मराठीच उत्तर देणार वा बोलणार हे म्हटल्याने होणारे नाही.
Comments
Post a Comment