चंद्रकलेचे रुप सानुले*

*चंद्रकलेचे रुप सानुले*


चंद्रकलेचे रुप सानुले , नील नभी विलसले
सख्या रे मनात मी हसले --

निळे निळे हे झुलते अंबर 
नाचे खाली विशाल सागर 
चंद्रबिंब  ते नभी हासता , दरिया वर उसळे   --


धवल  चंद्रीका होती  विहरत 
अम़ूतस्पर्शे  अवनी पुलकित 
गंध प्रीतीचा मनी दरवळे , प्रीतीपुष्प उमलले --


आठवणींचे ओघळले सर
तुझे सावळे रुप मनोहर 
मोहून गेले, मला न कळले ,अशी कशी मी फसले --

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*