हिमराणी*
*हिमराणी*
कापसापरी तरल धुक्याचा लेवुनिया बुरखा
कोण असे ही स्वप्नसुंदरी ?झाकतसे स्वमुख
दरीदरीतुन, गिरीराजीतुन ,खिदळत जलधारा
"पहलगाम"च्या अंकावरती ,झुलते "लंबोदरा"
शुभ्रधवल त्या हिमगुच्छांनी ,गिरीशिखरे फुलती
रविराजाच्या आगमनाने ,अलोकित धरती
उंच उंच ते चिनार ,पाइन,गगनाला भिडती
उंच उंच त्या हिमशिखरांशी,जणु स्पर्धा करती
तेजकणांनी चमचम करती , मुकूट सोनेरी
देई उधळून ,वैभव सारे,सुर्याची स्वारी
जललहरीसह क्रीडा करती ,जलबिंदू सान
दंग होउनी ,भान हरपुनी,चालतसे नर्तन
खळखळ मंजुळ नादमधुरते चाले मधुसंगीत
अवखळ चंचल लहरीमधुनी वाहे ती अविरत
रूपवती ही,आली कोठून? कोठे ही चालली?
अमूतकुंभा कठी घेउनी, उर्वशी अवतरली
हिमराणीचे करिती स्वागत , हिरव्या वूक्षतती
कमान करुनी,वातेे हलुनी,मस्तक ते झुकवती
धुंद रम्य त्या वातावरणी ,सुखावले मनमन
थांबली गती,गुंगली मती,गेले भारावुन
मोहमयी त्या सूष्टीचे मज वाटे आकर्षण
अशीच कधीतरी देते दर्शन होता मी उन्मन
Comments
Post a Comment