भिंती पलिकडची शाळा .

भिंती पलिकडची शाळा .

मनुष्य स्वतः च्या अनुभवावरून , त्याला मिळालेल्या प्रेम ,स्नेह किंवा मैत्री ,राग,द्वेष, मत्सर  यांच्या बळावर स्वतः ला घडवतो . लेखिका म्हणते , याच प्रक्रियेला शिक्षण असे म्हणतात. कुठलेही बालक जन्माला येतानाच स्वंयशिक्षणाची प्रेरणा घेवून येते. 
भिंतीपलीकडली शाळा ,
 हे पुस्तक स्वानुभवातून ,काही उपक्रम राबवून माधुरी देशपांडे यांनी
लिहीलेले आहे.   
शिक्षणावर बोलू काही ,या संदर्भात ले
 हे पुस्तक.
शिक्षण हा बालकांचा हक्क आहे हे एकदा  मान्य केल्यावर प्रत्येकाला शाळेत प्रवेश मिळायला हवा. पण तसे घडत नाही. आपल्याला शाळा तर दिसते. शाळेतील भिंती ,बाकं ,दारे खिडक्या ,फळे ,बोर्ड आणि वर्गावर्गातील मुले , त्यांचे शिक्षक परंतु शिक्षण दिसते का हा खरा प्रश्न. लेखिकेला एके दिवशी  नर्सरी शाळेत जाताना रोज रडणारे अडीच वर्षाचे मुल दिसले आणि निरीक्षणातुन मग ही शाळा आकाराला आली. त्या मुलीमध्ये डाउन सिंड्रोम म्हणजे एक प्रकारचे मतिमंदत्व होते ( Genetic disorder ).
ती मुलगी आणि स्वतः चा मुलगा नुकताच चालायला लागलेला. 
आणि मग १९८८ साली ही दोन मुलांची शाळा अंकूर बाल मंदिर  या नावाने सुरू झाली. पहिले तीन महिने मुलांना उपक्रम देणे, मग त्यांचा प्रतिसाद घेणे. समाजातील सर्व साधारण मुलांसाठी तर शाळा गल्लोगल्ली त असतात.  परंतु सव्यंग आणि अव्यंग बालकांची एकत्रित शाळा सुरू करून त्यांच्यातला भेदभाव नष्ट करणे हा या शाळेमागचा मुख्य उद्देश.
 मुलांच्या  क्षमतांचा अभ्यास करावयाचा ,पातळ्या समजुन घ्यायच्या ,त्यांच्या आवडीनिवडीचे निरीक्षण करावयाचे , लक्ष पुरवायचे .
आणि पालकांशी चर्चा ,मनमोकळेपणाने बोलणे वगैरे आलेच.
ती मुलगी का रडायची रोज? तर तिला तिथं जायला आवडायचे नाही. तिला बसायला छोटी खुर्ची नाही. लेखन वाचन ग्रहपाठ इंग्रजीत  आणि आम्ही घरी बोलतो मराठी. म्हणजे प्रश्न कसे असतात बघा. अंकुर बाल मंदिर 
या शाळेचे थेरपी सेंटर देखील आहे.
ही एकमेव शाळा अशी आहे जिथं सव्यंग मुलांना समान हक्क प्राप्त करण्यासाठी संधी मिळते.  भारतात असा कायदा सुध्दा आहे  ज्याअन्वये सव्यंग आणि अव्यंग मुलांना एकत्रितपणे शिकण्याची संधी मिळावी.
आपल्याला शाळेतील अद्रश्य भिंती दिसत नाहीत.
तु नापास झाला आहेस म्हणून तुला प्रवेश नाही. मानसिक द्रष्ट्या अपंग आहेस म्हणून प्रवेश नाही, असे म्हणून मुख्याध्यापक मोकळे होतात. यदाकदाचित एखाद्या बालकाला प्रवेश मिळाला तरी त्याला त्या शाळेच्या भिंती जाणवू  लागतात.
मग त्या वागणुकीच्या असोत की क्षमतेच्या . बुध्दीमत्तेच्या असोत की सामाजिकतेच्या . ते बालक इतरापेक्षा वेगळे म्हणून न सामावून घेण्याचे धोरण असते. म्हणून एखाद्या शाळेनेच या अद्रश्य भिंती काढून टाकल्यास त्या बालकांना स्वंयविकासाची संधी उपलब्ध होईल आणि त्याचे भवितव्य उज्ज्वल होईल. अशाच एका अभिनव प्रयोगाविषयी हे पुस्तक आहे.

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*