जिथे मुलांना पंख फुटतात*
*जिथे मुलांना पंख फुटतात*
मूळ लेखक- डॅनियल ग्रीनबर्ग
अनुवाद - नीलांबरी जोशी
प्रकाशन- मनोविकास
किंमत -१८०
पृष्ठ। -१७७
'सडबरी व्हॅली स्कूल' या आगळ्यावेगळ्या शाळेची अद्भुत गोष्ट.
*“या शाळेत मुलांना जबाबदार नागरिक म्हणून वागवलं जातं आणि मुलं स्वतःची जबाबदारी स्वतः घेतात. मुलांनी विचारेपर्यंत शिक्षक मुलांमध्ये ढवळाढवळ करत नाहीत. स्वतःला आतून काय आवडतं ती गोष्ट मुलं स्वतः शोधतात. आणि नंतर वेड्यासारखा तिचाच ध्यास घेतात. स्वतःच निवडलीअसल्यामुळे ती ती गोष्ट नीट शिकतात. एकूण काय तर मुलं स्वतःच्या भविष्याची खरी शिल्पकार ठरतात!”*
अशा या शाळेची ही यशोगाथा वाचतांना वाचक अगदी मन लावून पुस्तक वाचायला सुरुवात करतो.
*"शाळेत शिकवला जातं त्यात लुडबूड न करण म्हणजे काय? तर मुलांना शिक्षणातून जे काय मिळवायचं त्यात ज्याची त्यांना गरज वाटतेय तितकच शिकू देण्याची मुभा द्यावी . त्यांना ज्यांची गरज नाही आणि जे त्यांना नको आहे ती त्यांच्यावर लादू नये.*
* मी म्हणतोय तशा शाळा अजून शंभर वर्षातनंतर तरी असतील का याची मला शंका आहे. एकूणच विद्यार्थ्यांना मुक्तपणे निर्णय घेऊ देणारी शिक्षण पद्धती पुढच्या शंभर वर्षांत तरी सुरू होईल असं मला वाटत - लिओ टॉल्स्टॉय
शिक्षण आणि संस्कृती याबद्दल टॉलस्टॉय यांनी केलेले हे विधान विचार करायला लावणारे आहेत. विचार करणारा प्रत्येक शिक्षणतज्ञ हा एक शिक्षण क्षेत्राला लिहिलेला असतोच. ते मूलभूत प्रश्न म्हणजे शिकवायचा किंवा शिकायचा सर्वश्रेष्ठ मार्ग कोणता? मुलांनी कोणती विषयी शिकावेत? मुलं किती जबाबदारी घेतात ?ती जी काही करतात त्यात त्यांचा स्वतःचा विचार किती प्रमाणात असावा ?लोकशाही पद्धतीत शाळा कशी चालवावी? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सडबरी व्हॅली च्या या शाळेत मिळतात. खरतर शिक्षणाविषयी प्रत्येकाच्या चांगल्या कल्पना आपण जपून ठेवायला हव्यात आणि प्रचलित पद्धतींना धक्का द्यायला हवा. अनेक जण विचार करतात पण कृती मात्र करत नाहीत.
परंतु कधीकधी वेगळ्या वाटेने चालत जाऊन आपली एक नवीन वाट तयार करणारी काही माणसं, संस्था आपल्या आजूबाजूला दिसतात.
परंपरेची बांधिलकी न मानणारे, या प्रश्नांची उत्तरे शोधत शोधत वेगळा विचार करून वेगळीच उत्तरे मांडतात. या उत्तरान द्वारे पाऊलवाटेचे महा डीजे मार्गात रूपांतर होतं. ऍरीस्टाटल न दोन हजार वर्षापूर्वी त्याच्या मेटॅफिजिक्स मध्ये एक तत्त्व मांडले-" माणसं नैसर्गिक रीत्याच जिज्ञासू असतात" या तत्त्वानुसार सडबरी व्हॅली स्कूल कार्य करताना आपल्या लक्षात येतं.
डॅनियल ग्रीनबर्ग या मूळ लेखकाने या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यासमोर नवनिर्माण करणारी व मुलांच्या कलानुसार शिकू देणारी शाळा व तिचे मोकळे पण मांडले आहे . अशा शाळेचे चपखलपणे वर्णन माननीय निलांबरी जोशी यांनी मराठीत अनुवादीत करून आपल्यासमोर एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मराठी अनुवाद केलेला आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये जगात दीर्घकाळ चालणारी मुक्त विचारांची शाळा" समर हिल" हीच आपण उल्लेख केलेला आहे.
"शाळा मुलांसाठी योग्य असायला हवी मुलं शाळेसाठी नव्हे "असा विचार समरहिल ने सुरु केला. मुलांवर जबरदस्ती केली नाही तर ती उत्तम पणे शकतात यावर समरहिल यांचा दृढविश्वास होता. या शाळेचा आदर्श समोर ठेवून सडबरी व्हॅली स्कूल मध्ये सुद्धा मुक्त संचार पद शिक्षण पद्धतीचा उपयोग केलेला आपणास वाचनास मिळतो.
पुस्तकाची रचना दोन भागांमध्ये करण्यात आलेली आहे 1.शाळेतले शिक्षण 2.शाळेतलं आयुष्य. शाळेतले शिक्षण या अंतर्गत गणित, वर्ग, सातत्य ,उमेदवारी,वाचन, माशीमारी, प्राणी पाळणारे शूरवीर, रसायनशास्त्र , विशेष खर्च ,शाळेसाठी लागणाऱ्या वस्तूंचा शोधाशोध,फऍड आणि फॅशन शाळा आंतर्गत समित्या, पाककला विशेष खाती, नातं मुला मुलांचं, खेळ, ग्रंथालय, वेळेचे गणित, अध्ययन, मूल्यमापन, टार्च. अशा पद्धतीने शाळेतले शिक्षण सविस्तरपणे मांडणी केलेली आहे.
परंपरागत शिक्षण पद्धतीमध्ये मुलांना गणिताची भीती वाटते. परंतु सडबरी व्हॅली स्कूल मध्ये गणिताचे अध्यापन पद्धती या पद्धतीची आहे. जो तो आपल्या कलानुसार आवडीनुसार शिकत असतो. हे वाचताना आपल्याला नवलच वाटतं. शब्द वापरताना फार जपून वापरावे लागतात. दोन माणसांचा एकाच शब्दाचा अर्थबोध सारखा झाला तर ते एक अद्भुत आश्चर्य ठराव. करण बऱ्याचदा तसं होत नाही. शाळा नसलेल्या संस्कृतीमध्ये वर्ग हा शब्द कदाचित नसेल. सडबरी व्हॅली स्कूल मध्ये वर्ग म्हणजे दोन पक्षांमधील व्यवस्था. ती व्यवस्था एका पासून किंवा अनेक पासून सुरू होते. मुलं त्यांना काहीतरी शिकायचं असं ठरवतात . आणि प्रत्येक वर्गात फक्त एकाच वयाची मुलं नसून वेगवेगळ्या वयाची मुलं त्यांना जिथे वाटेल जसं वाटेल तसं बसतात. कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य न गरजेच असतं हे सातत्य सडबरी व्हॅली स्कूल मध्ये सातत्यानं पाहायला मिळतो. उमेदवारी म्हणजे काय उमेदवारीचा अर्थ कसा पटवून द्यायचा। याविषयीचे प्रॅक्टिकल प्रत्यक्ष या शाळेच्या विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या जातात. अनेक वेळा आपण आपल्या मुलांच्या वाचना लेखनाच्या संदर्भात उतावीळ झालेले असतो. कधी येता आपलं मूल वाचता आणि लिहित होतं याचीच आपण चिंता करायला असतो. परंतु सडबरी व्हॅली स्कूल मध्ये वाचनाच्या संदर्भात मुलं पुढेमागे कधीही वाचायला शिकतात. तिचा बाऊ मात्र केला जात नाही असा आपल्या वाचायला मिळतो.
मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता. त्यांना आपल्या समाजजीवनाशी जोडण्याचे काम ही शाळा करायले आपल्याला दिसते मासेमारी करणारी मुलं, प्राणी पाळणारी मुलं, रसायनशास्त्र शिकणारी मुलं व शाळेसाठी लागणाऱ्या वस्तूंची शोधाशोध करणारे मुलं हे फक्त केवळ पुस्तकी ज्ञान नसून प्रत्यक्ष स्वतःच्या जगाशी जोडण्याचं काम आहे असा आपल्याला जाणवतं. शिस्त आणि नियोजन चालवण्यासाठी शाळे अंतर्गत समित्यांची कशी निर्मिती केली जाते. व त्यानुसार शाळेचा कारभार कसा चालतो. याचं प्रत्यक्ष सादरीकरण आपणास वाचायला मिळतं. मुलं एकमेकांच्या सहकार्याने शिकतात हे पाहणं हा एक आनंददायक अनुभव असतो. कॅडबरी भारी मध्ये जिकडे नजर टाकू तिकडे सर्व वयाची मुले एकत्र काम करताना दिसतात हे दृश्य वेगळं समाधान देऊन जातं. या सगळ्याला एक भावनिक बाजूही असते. सोळा वर्षाचा मुलगा किंवा मुलगी जेव्हा सहा वर्षाच्या मुलाला पुस्तक वाचून दाखवत असतो तेव्हा त्यांच्यातील निसर्गदत्त महत्वाची भावना देखील पूर्ण होत असते आणि त्या सहा वर्षाच्या मुलाला आपली कोणीतरी काळजी करतो या विचारांना बरं वाटतं. असे कितीतरी प्रसंग आपणास यामध्ये वाचायला मिळतात. आणि मन अगदी सुखावून जातं. शाळेत घेतल्या जाणाऱ्या सभा व त्यामध्ये प्रत्येकाला असलेलं महत्त्व हे आजच्या लोकशाहीला समर्थक असलेले उदाहरण आपल्याला वाचायला मिळतं. शाळेतील प्रत्येक मुलाच्या मताला महत्त्व दिले जाते प्रत्येकाचा आदर कसा राखला जावा हे यातून मुलं शिकत असतात शाळेतील खेळ असो वा कॅम्पिंग असो मुलं अगदी सहजरीत्या संचार करायले ले आपल्याच दिसतात. पालक असो वा पाहुणे पाहुणे या सर्वांना सडबरी व्हॅली स्कूल मध्ये मुलांच्या भवितव्याचा, मुलांच्या मोकळेपणाचा खूप कुतूहल वाटतो.... असही सगळ कुतूहलं रुपी पुस्तक वाचत वाचत आपण शेवटच्या पानाकडे कधी येऊन पोहोचतो हे लक्षात येत नाही. सडबरी व्हॅली स्कूल या शाळेच्या अनुभवावर आधारित ग्रीनबर्ग यांनी अत्यंत सोप्या साध्या शैलीत मांडलेली ही अनुभव कथा नीलांबरी जोशी यांनी मराठीत अनुवादीत करून आपल्यासमोर एक नवनिर्मितीचा खजिना सादर केला आहे. जो आज वेगळ्या वाटेवरून काम करणारे शिक्षकांना आपल्याकडे खुणावल्या शिवाय राहणार नाही. वेगळ्या वाटेवरून चालणाऱ्या वाटसरूंसाठी सडबरी व्हॅली स्कूल हे वाळवंटातील मरूस्थळ आहे. शिक्षणाच्या या मार्गातला आनंदवन आहे.
Comments
Post a Comment