झाडाझडती

झाडाझडती


तुमच्या बागा फुलाव्यात, ऊसमळे झुलावेत, साखर कारखाने
निघावेत, यंत्रं चालावीत,
तुमच्या घराघरात वीज खेळावी, म्हणून आम्ही आमची गावं
आणि आमचं भवितव्य
धरणाच्या घशात कोंबलं. विकासाचा नारळ फोडण्यासाठी दगड म्हणून आमची डोकी वापरलीत. खोबरं तुम्हाला
मिळालं आणि आम्ही पाण्यासाठी, साध्या स्मशानासाठी
भिका मागायच्या.
जिवंतपणी आणि मेल्यावरही झडती चालूच.
गाव आणि देव पाठीवर बांधून चालणार्या हजारो
धरणग्रस्तांची मन सुन्न करणारी कहाणी. प्रसिद्ध
लेखक विश्वास पाटील यांची साहित्य अकादमी पुरस्काराने
सन्मानित ही कलाकृती प्रखर वास्तव समोर आणते. धरण
होण्याच्या घटनेभोवती फिरणाऱ्या आयुष्याची, क्रियाप्रतिक्रियांची ही व्यापक कहाणी आहे. दहा-पंधरा
वर्षांच्या काळातील, प्रदेशातील आणि मानवी जीवनातील
बदल कादंबरीत टिपले आहेत. धरण, धरणग्रस्त, समाज,
संघटना, राजकारण आदींचा वेध कादंबरीने घेतला आहे. धरण
बांधले जाते, तेव्हा गाव विखरून जाते. गावात राहणारी माणसं
विस्थापित होतात. तेव्हा त्यांचे काय होते, त्यांची मानसिक अवस्था कशी असते, पुनर्वसनातही राजकारण कसे
येते, आणि या सगळ्या माणसाचे जगणे कसे येते स्वस्त होऊन
जाते, याचे सूक्ष्म दर्शन पाटील यांनी कादंबरीतून घडविले
आहे.
ही कादंबरी सत्य घटनेवर आधारीत आहे असच म्हणाव
लागेल...पानशेत,कोयना अशी धरण जेव्हा बांधली गेली तेव्हा ज्या लोकांची गाव हटवली गेलीत त्या लोकांची काय हालत
झाली असेल आणि आजही ती तशीच आहे याचा जिवंत
पूरावा म्हणजे हि कादंबरी...संपूर्ण महाराष्ट्र विजेच्या
लखलखाटात न्हात असताना यांच्या पिढ्यानपिढ्या अंधारात
खितपत पडल्या आहेत असे हे लोक………….
कादंबरीची सुरुवात गोम्या कोळी आणि त्याचा हल्या(रेडा) यांच्यापसून होते..पखालीतून हल्याच्या पाठीवर पाणी
आणायच आणि ते गावात लोकांच्या रांजणात भरून
मिठभाकर खायची अस सहज आणि सोप त्यांच जीवन
धरणाच्या प्रवाहात वाहून जात. स्वतःच्या मूलासाठी साखर
कारखाना काढावा आणि त्याला पाणी मिळाव म्हणून
खासदार शिंगाडे धरणाचा प्रस्ताव मांडतो. साध्या भॊळ्या लोकांना आश्वासनाची साखर चारतो. या धरणामूळे काही गाव
दुसर्या जागी विस्थापित होणार असतात. गावतले लोक या
गोष्टीला विरोध करतात. पिढ्यान पिढ्या इथे जगलेली,
इथल्या मातीत रुळलेली माणसे कस काय आपल गाव सोडून
परक्या गावात जाणार... बागायती शेती आंबा पेरूच्या बागा,
स्वतःच घर सोडून जाण त्यांना नाही पटत, पण अखेरिस सरकारच्या ताकदीपूढे त्यांना माघार घ्याविच लागते...
लाभक्षेत्रातले शेतकरी सुद्धा सुरुवातीला तुम्ही आमची
जमिन घ्या शेतीला तुम्ही आमचे भावबंध अस गोड गोड
बोलून फ़सवतात... हैबती सतत आठ वर्ष आज ना उद्या
पर्मनंट होईल या आशेवर नोकरी करत असतो पण सरकारी
लोक त्याचे २४० दिवस भरुच देत नाहीत. शेवटी वयाची २८ वर्षे पूर्ण होतात आणि तो गावाकडे परत येतो अनेक
वर्ष होऊनही या लोकांच पूनर्वसन होत नाही. असे
खितपत पडलेले हे लोक आणि अशी हि मेलेल्या
माणसाच्या सरणावर भाकर्या भाजून खाणारा सरकार अस
वर्णन विश्वास पाटिल यांनि या कादंबरीत केल आहे.
धरणग्रस्तांचे होणारे हाल वाचकाला पुस्तकाशी बांधुन ठेवतात. त्याच वेळेस त्याच्या समोर अनेक प्रश्न सुद्धा निर्माण
करुन जातात. ह्या धरणग्रस्तांना एवढे सोसण्याची ताकद
कुठुन मिळत असेल? ३०-४० वर्षापुर्वी झालेल्या
धरणांच्यासाठी जमीनी देलेल्या लोकांचे प्रश्न आजही
सुटलेले नाहीत. 
ह्या सगळ्यात आपण कुठे आहोत?? एकुणच इतकी वास्तवाचे दर्शन देणारी कादंबरी प्रत्येकाने एकदा वाचावी असे वाटते.
अशा पिढ्यानपिढ्या अंधारात खितपत पडलेल्या
धरणग्रस्तांना शतशः सलाम………………

सौ.मनिषा राजन कडव

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*