आई समजून घेताना
" आई समजून घेताना" हे उत्तम कांबळे ह्याच पुस्तक वाचनात आले
"आई समजून घेताना" ही कथा आहे एका माय-लेकराची आणि एका उपेक्षित समाजाची.
आई समजून घेताना आणि जे समजून घेतलं आहे ते शब्दांत व्यक्त करताना आपले शब्द थिटे पडत असल्याची खंत लेखकाने वारंवार व्यक्त केली आहे. तीच अवस्था ह्या पुस्तकाचा मित्रांना परिचय करून देताना माझी होते आहे.
लोकशाही मध्ये कायद्यासमोर सर्व समान आहेत, पण समाजव्यवस्थेमध्ये सर्वांना समान हक्क आहेत का हा प्रमुख प्रश्न आहे.
लेखकाच्या आईच नाव (इलंदा, लेखकप्रमाणे ती आता संपूर्ण महाराष्ट्राची अक्का झाली आहे) इलंदा ह्या नावाला कोणताही अर्थ नाही.
मनुस्मृती वाचल्यानंतर लेखकाला ह्या नाव ठेवण्यामागचा इतिहास समजतो.
नाव ठेवताना देखील समाज भेदभाव करतो.
पण अक्काने आपल्या मुलांची नाव अर्थ असणारी ठेवली, उत्तम, सुदामा, सुशीला....
लेखकाचे वडील महार रेजिमेंट मध्ये साधे शिपाई.
'आई समजून घेताना' हे उत्तम कांबळेंचे पुस्तक वाचताना आणखी एका आईची ओळख होते. वयाच्या पन्नासाव्या वर्षी आठवणी ताणत लिहिलेले हे पुस्तक. जसे आठवत गेले तसे लिहित गेल्यामुळे आठवणींना अनुक्रमणिका नाहीत. लेखकाच्या आयुष्यात प्रकाशवाटा घडविण्यासाठी आयुष्यभर राबलेली लेखकाची 'अक्का' स्वत:साठी वर्तमान घडवू शकली नाही ही लेखकाची तक्रार. स्वत: अतिशय कष्ट घेऊन मुलांच्या वारेमाप खर्चामुळे अस्वस्थ होणारी आई.
'तुझ्या लहानपणी आपन दोघं रोजगाराला गेलो आणि दिवसभर राबलो तर फक्त चार-पाच रुपये मिळायचे. इथं तुझं पोरगा तर दहा रुपयाच्या चॉकलेटचा एकच घास करतो. तुला मागचं दिवस कसं आठवत नाहीत' लेखकाला वारंवार भूतकाळात नेणारी लेखकाची आई. भाकरीच्या तुकड्यासाठी लहाणपणाची लाचारी आठवायला लावायची, तोंडातून लाळ गळेपर्यंत विनवण्या आठवायला लावायची. माणसाच्या दुखा:चे कारण इच्छाच असते हे तत्त्वज्ञान सांगणारी आईच असते.
पोटाची आग विझवण्यासाठी जेवणा अगोदर पाणी, जेवताना पाणी आणि जेवण झालं की पाणी कमी अन्नामध्ये पोट भरण्याचा "पाणी फॉर्म्युला" अक्काने तयार केला होता अस लेखक सांगतो.
पण पुढे लेखकाची परिस्थिती सुधरल्यावर आईला आजाराने घेरल्यामुले तो "पाणी फॉर्म्युला" उपचार म्हणून वापरावा लागतो.
मुलांना वाढवताना हाताचा नाही तर देवाने दिलेल्या मेंदूचा वापर करावा हे शिकवणारी अक्का.
प्रत्येक तरुणाने आपल्या तरुणपणात एकदा तरी "आई समजून घेताना" हे पुस्तक वाचायला पाहिजे.
तुला काय समजतंय.
तू गप्प बस...
मला तुझ्याशी वाद नाही घालायचा.
तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही..!
हे शब्दच मग तुमच्या तोंडातून कधीच बाहेर पडणार नाहीत.
कारण आई ही अशिक्षित असो वा सुशिक्षित ती जगातील सर्वात मोठं महाविद्यालय आहे.
सौ.मनिषा राजन कडव.
छान परीक्षण लिहिले ,शुभेच्छा 💐💐💐
ReplyDelete