"नाथ हा माझा"

"नाथ हा माझा"

शब्द अपुरे पडावे अशी बुद्धिमत्ता, सौंदर्याने लाजावे असे राजबिंडे रूप, कलेने पायाशी लोळण घ्यावी अशी अभिनय क्षमता..भारदस्त आवाजाची देणगी लाभलेले नाव एव्हाना आपल्या लक्षात आलेच असेन डॉ. काशिनाथ घाणेकर... निळ्या डोळ्यांची जादू कशी झाली ते सांगत आहेत त्याच्या पत्नी कांचन काशिनाथ घाणेकर...  "नाथ हा माझा.. या पुस्तकासाठी... खूप दिवसांपासून डॉ. काशिनाथ घाणेकरांबद्दल चर्चा सुरु होतीचं त्यांच्या जीवनपटावर आधारित चित्रपटामुळे....पण त्यांना अधिक जाणून घेण्यासाठी"नाथ हा माझा " उत्तम पर्याय आहे... डॉ. काशिनाथ घाणेकर एक असा अभिनेता ज्याने अभिनय स्वतःच्या अंगाअंगात मुरवून घेतला होता..पहिली पत्नी इरावती या निष्णात स्त्री रोग तज्ञ होत्या पण तरीही मातृत्वा पासून वंचित.. घाणेकरांना लहान मुलांची प्रचंड आवड पण इरावती बाईनंचा दत्तक मुलाला विरोध...घाणेकरांनी मग स्वतः ला अभिनयात झोकून दिले.. रायगडाला जाग येते यात त्यांनी केलेली संभाजी महाराजांची भूमिका लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली..याच नाटकाच्या निमित्ताने सुलोचना चव्हाण यांची एकुलती एक कन्या कांचन यांच्याशी ओळख झाली... कांचन याना घाणेकरांबद्दल ओढ निर्माण झाली... घाणेकरणाचा अभिनय,सौन्दर्य, निळे डोळे अन भारदस्त आवाज यामुळे त्या प्रभावित झाल्या.. सततच्या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले, त्यावेळी त्या अवघ्या चौदा वर्षांच्या होत्या..घाणेकरांहून पंधरा वर्षांनी लहान...हळु हळु ही बातमी सुलोचना बाई पर्यंत पोचली, कोवळ्या वयातील प्रेम म्हणून घरच्यांकडून त्याला विरोध होताच त्यानंतर मात्र त्यांना घाणेकरांना भेटणे, बोलणे, त्यांची नाटकें पाहणे यावर बंदी घालण्यात आली.. यश अपयश पचवत घाणेकरांचा प्रवास सुरु होता त्यात त्यांना असलेली व्यसने अधिक प्रमाणात उफाळून येऊ लागली.. दारू मुळे त्यांच्या आवाजावर परिणाम होऊ लागला त्यामुळे त्यांना नाटकात काम करणे ही जमेनासे होऊ लागले चांगल्या भूमिका त्यांना दुरावत चालल्या... अनेक स्रियांसोबत असलेले प्रेमसंबंध आणि दारू यामुळे इरावती बाईंनी त्यांच्यापासून घटस्फोट घेतला.. या घटनेने ते अजूनच कोलमडून पडले..तरीही कांचन यांचे प्रेम तसूभरही कमी झाले नसल्या कारणामुळे शेवटी घरातून त्यांच्या लग्नाला संमती मिळाली अन त्या छत्तीस वर्षाच्या आणि घाणेकर एकावन्न वर्षाचे असताना त्यांचे लग्न झाले.. वाढत्या वयाचा विचार करून त्यांनी मुलं न होऊ देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचे स्वप्न सत्यात उतरू शकले नाही... लग्नाच्या दहा दिवसातच कांचन याना त्यांच्या अतिरेकी दारू, लोकांसोबत उद्धट वागणे, राग चिडचिड याचा प्रत्यय येऊ लागला अन त्यांनी सुलोचनाबाईनं कडे जाण्याचा निर्णय घेतला..हे पुस्तकं फक्त जिवन चरित्र नसून एक शिकवण आहे.कुठल्याही गोष्टीचा अतिरेक माणसाला शेवटी नेस्तनाबूत करू शकतो... कोणत्याही गोष्टीत टोकाची भूमिका घेणारा स्वभाव आणि व्यसन या दोन गोष्टीनी घाणेकरांना असामान्यातून सामान्य लोकात आणून बसवले ही गोष्ट ही त्यांच्या पचनी पडली नाही.. सतत यशाच्या शिखरावर असणाऱ्या कलाकाराला अपयश पचवता आले नाही...पु. ल. यांनीसुद्धा यां पुस्तकात डॉ. घाणेकर यांच्या बद्दल विलक्षण मत नोंदवले आहे पुस्तकं वाचताना तुमच्या लक्षात येईनचं ते... कांचन घाणेकरांचे प्रेम,संसार कथा,व्यथा आणि काशिनाथ घाणेकरणाचा रंगभूमी प्रवास ते शेवट जाणून घेण्यासाठी हे पुस्तकं नक्की वाचण्यासारख आहे... याचे प्रकाशन मेहता पब्लिकेशन ने केले आहे.
सौ.मनिषा राजन कडव.

Comments

  1. मार्मिक शब्दात परीक्षण लिहिले....!

    ReplyDelete
  2. मी हे पुस्तक वाचले आहे .आपण खूपच छान शब्दात परीक्षण केले आहे .

    ReplyDelete
  3. खूपच छान शब्दात वर्णन लिहिले आहे madam

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*