नारायण मूर्ती - 'मूल्य जपणारं एक अद्वितीय आयुष्य’

.
फोटो स्ञोत गुगल.
‘नारायण मूर्ती - 'मूल्य जपणारं एक अद्वितीय आयुष्य’ 


प्रेरणादायी व मार्गदर्शक जीवनचरित्र... मूळ तमीळ लेखक एन. चोक्कन यांनी ‘नारायण मूर्ती : मूल्य जपणारं एक अद्वितीय आयुष्य’ हा ग्रंथ लिहिला असून त्याचा गुजराती अनुवाद अदित्य वासू यांनी केला आहे व त्याचा मराठी अनुवाद अंजनी नरवणे यांनी केला आहे. ‘नारायण मर्ती : मूल्य जपणारं एक अद्वितीय आयुष्य’ हे चरित्र मेहता पब्लिशिंग हाऊसने देखण्या मुखपृष्ठासह आकर्षक स्वरूपात प्रकाशित केले आहे. इन्फोसिस या जगप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीच्या संस्थापकांपैकी एक आणि देशातल्या प्रमुख उद्योगपतीपैकी एक असणाऱ्या नारायण मूर्तीच्या जीवनाची कथा अलिखित करणारं हे चरित्र! अनंत अडचणीतून मार्ग काढून एखादी व्यक्ती यशाचं शिखर कसं गाठू शकते याची प्रेरणा देणारं व मार्गदर्शन करणारं नारायण मूर्तींचं जीवनचरित्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पदर सहजसुंदरतेने उलगडून दाखविते. एका गरीब ब्राह्मण कुटुंबात २० ऑगस्ट १९४६ रोजी नारायण मूर्तींचा जन्म झाला आणि हेच नारायण मूर्ती सध्या इन्फोसिस टेक्नोलॉजीज लिमिटेड या बेंगलोर स्थित जागतिक सॉफ्टवेअर सल्लागार कंपनीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. द इकॉनॉमिस्ट ने २००५ मध्ये जगातील सर्वाधिक आदरणीय व्यवसायिकांत पहिल्या दहामधील एक म्हणून श्री नारायण मूर्तींची नोंद केली आहे. इतकंच नाही तर भारत सरकारकडून पद्मविभूषण, फ्रान्स सरकारकडून तर ब्रिटिश सरकारकडून सीबीई ने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.  ‘नारायण मूर्ती : मूल्य जपणारं एक अद्वितीय आयुष्य’ हे जीवनचरित्र असल्याने लेखकानं त्याचे बालपण कौटुंबिक वातावरण, आर्थिक परिस्थिती, आई-वडील यांच्याकडून त्यांच्यावर होणारे संस्कार यांचा तपशील देत, नारायण मूर्तींच्या मनाची जडण-घडण कशी झाली याचे अतिशय हृद्य शब्दांकन केले आहे.आय.आय.टी.मध्ये प्रवेश मिळाला होता; परंतु ते तिथे शिकायला जाऊ शकले नव्हते, कारण त्यांच्या वडिलांकडे त्यांना ते शिक्षण देण्याइतके पैसे नव्हते. त्यांच्या सात मित्रांबरोबर नवी कंपनी सुरू करण्यासाठी त्यांनी त्यांच्या पत्नीकडून १०,०००/- रुपये उसने घेतले होते! क्षुल्लक कारणाने झालेल्या गैरसमजापायी एका साम्यवादी देशाच्या तुरुंगात त्यांना साठ तास कोंडून ठेवलं होतं! कॉम्प्युटरच्या दुनियेत प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी अहमदाबादच्या आय.आय.एम.मध्ये अत्यल्प पगारावर नोकरी पत्करली. आणि आज?... आज नारायण मूर्ती आणि त्यांच्या मित्रांची कंपनी ‘इन्फोसिस’मध्ये १,३०,००० कर्मचारी नोकरी करत आहेत आणि कंपनीचा वार्षिक नफा १,००० कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे! ह्या उज्ज्वल यशामागच्या बहुमोल जीवनाचं चित्रण ह्या पुस्तकात आहे. – आयुष्याला प्रेरणा देईल आणि मार्गदर्शन करेल, अशा ह्या पुस्तकाचं स्थान तुमच्या आयुष्यात कुठं असलं पाहिजे, ते तुम्ही ठरवायचं आहे.

फोटो स्ञोत गुगल.

सौ.मनिषा राजन कडव

Comments

  1. छान पुस्तकाचा परीचय करवून दिलात .💐💐💐

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*