कोरोनाला पत्र

कोरोनाला पत्र


सुरुवात कशी करू ....

कोरोना
तुला प्रिय कसं म्हणावं?
पाहूणा म्हणून आलास आणि ठाण मांडून बसलास.पाहूण्यांची पाठ पाहायची सवय आम्हाला आहे,लाट पाहायची नाही.
असं काही नांव असेल,असा काही रोग असेल असं वाटल ही न्हवतं.तूला नैवेद्य ही वेंटिलेटर, ऑक्सिजन सिलेंडर, रेमडेसिवर चा लागतो.
तू त्सुनामी प्रमाणे अचानक आलास,जगावर राज्य करायला. अस्तित्वाचा प्रश्न येतो तेव्हा माणसें हतबल होतात. सेन्सेक्स खाली आणणारा, अनेकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान करणारा, मोठ्या स्पर्धा रद्द करणारा, अनेक व्यवसाय धोक्यात आणणारा, राष्ट्रप्रमुख यांचेही दौरे रद्द करायला लावणारा, तू जगभर आपले साम्राज्य प्रस्थापित करत आहेस. सर्व मानवजात देवानंतर तुझाच विचार करत आहे.देऊळ बंद करणं सोपं आहे.माणसें स्वतःला बंद करून घेत आहेत.माणसांनी उत्स्वही बंद केले.
सामाजिक अंतर नाही तर मानसिक अंतर ही माणसं ठेवायला लागली.चेहऱ्याविना मुखवटेच
सगळं ठरवतात.
Man proposes,God disposes. आता हे चित्र बदलले आहे. Man proposes Corona disposes. हे खरंच आहे.
आधी केलेले नियोजन लोकांना रद्द करावा लागंत आहे.१२० देश लाखो लोकांना लागण,हजारो मृत्यू असे तुझे थैमान सुरू झालं.शाळा, चित्रपट गृह, सार्वजनिक कार्यक्रम बंद,एकत्र येणं बंद,हस्तांदोलन बंद, प्रेक्षक विना मॅच, यात्रा रद्द, देवालाही भेटण्यावरवर निर्बंध आले.असे तुझे निर्बंध सुरू झाले.माणसांना भेटायला तू निर्बंध आणू शकतोस प्रेमावर नाही.रस्ते लॉक डाउन करशील पण मनाला नाही करता येणार.
पूर्वी प्लेग,देवी,कॉलरा यांनी
 मानवजात उध्वस्तकेली. आधुनिक काळातील महामारी म्हणून तुला घोषित केलं आहे.
आता विज्ञानही हतबल आहे. अंधश्रध्दा वाढायला नैराश्य खतपाणी घालतं.लोक याला दैवी प्रकोप मानतात. नैराश्य आणि भिती याला लोकं शरण जातात.कलियुगात पाप वाढलं, अशा संकल्पना दृढ व्हायला लागतात.म्हणून अंधश्रद्धे पासून सुटका नाही.
मृत्युला निमित्त लागते. आता यम एकटाच नाही. मृत्यु वेगवेगळ्या रूपाने वेगवेगळ्या नावाने येतो.लोकसंख्या वाढल्यामुळे त्याच्या मदतीला अनेक नवीन रोग मृत्यू साठी मदत करीत आहेत.
करोना तो बहाना है.पूर्वी शत्रूचा नायनाट करायचा असेल तर करो या मरो म्हणलं जायचं. आता कुछ भी मत करो ना म्हणावं लागत आहे. करोना केवळ हात धुऊन मागे लागलं नाही, तर हातधुवायला भाग पाडत आहे.फ्रान्स ने सार्वजनिक ठिकाणी चुंबना वर बंदी घातली आहे. खाणं, पिणं, वागणं, राहणं यावरील बंदी लोकांना आवडत नाही.लोकांना नुसतंच स्वातंत्र्य नको, त्याबरोबर स्वैराचारही हवां.करोनाने जगण्याचें सोहळें, उत्सव हिरावून घेतले.
पणअस्तित्व धोक्यात येतं तेव्हाच माणसे जागी होतात.
कोरोना मुळे जगाची लोकसंख्या ६० टक्के पर्यंत येईल अशी शक्यता वर्तवली जाते आहे.
लाखोंना लागण व हजारोंना मृत्यू हा परीघ विस्तारत आहे.
कोरोनामुळे जगण्याचे परिमांण,समीकरणं, बदलत आहेत. 
विज्ञानाने एवढी प्रगती केली पण आज कोरोना व्हायरस पुढे सर्व हतबल आहेत. विज्ञानाने मृत्यू लांबवता येतो, पण थांबवता येत नाही.
तु झंजावाता सारखा आलांस, तसाच झंजावाता सारखा जावां, हीच इच्छा. मृत्यू कसा यावा याची प्रत्येकाची गणितं ठरलेली आहेत. मृत्यू अटळ आहे, तो नैसर्गिकच शांत चोरपावलाने यावा असे प्रत्येकाचे स्वप्न असते.
त्यामध्यें तू विघ्न आणू नयेंस.प्रत्येकाचे miles to go, bucket list बाकी आहे.
जन पळभर म्हणतील हाय हाय.. हे आम्हाला फक्त ऐकायला छान वाटतं. 
एका विषाणूंमुळे, सासूला सुन कळाली,सुनेला सासू कळालीं. पतीला, पत्नी कळाली पत्नीला, पती कळाला. आईला मुलगा कळाला,मुलाला आई कळाली नव्यानें सर्व नातीं कळाली.
कामाची विभागणी कळाली. 
चेहरे झाकल्या मुळे मुखवटे कळालें.
शारीरिक, मानसिक अंतराचे नवें परिमांण कळाले.
हे ही नसे थोडके.
कसलां एवढा उन्माद जगण्यासाठी?
उपकार केल्या सारखे जगायचे कशाला?
आनंदाच्या विलगीकरणात जगायचं कशाला?
प्रत्येक प्रेताचा ही दिवस असतो पण
मृत्यूने ही आता स्वतःचे चोचले,सोहळे बंद केलेत
इतिहासातलें सगळेच इतिहासजमा झालेंत
हवेने सुद्धा आता स्वतःचा लिलाव केला आहे
जगण्यासाठी कमीतकमी गरजांचेच
आता टेंडर पास होतें
अशा जगास्तव काय कुढावें?
जे गेले ते सुटलें असंच म्हणायचं का?
आज कुणीतरी यावे असं वाटतं पण तू कुणाला येऊ देत नाहीस, कुणाकडे जाउ देत नाही.
आज कुणीतरी जावें असं वाटतं ,तू ओळखून घेनां जरा कृपा करुन ....सगळंच ठप्प झालं की कुणाला जगावं वाटेल.
ये जिंदगी के मेले 
दुनिया में कम ना
होंगे 
अफसोस हम ना होंगे
म्हणायला लाऊ नकोस..

सौ.मनिषा राजन कडव
वय- ४४वर्ष
ठिकाण -कल्याण ,ठाणे
संपर्क क्रमांक - 9869718659,
8169239825
Email kadav.manisha77@gmail.com

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*