मध्यरात्री नंतरचे तास.
फोटो स्त्रोत गुगल -
मध्यरात्री नंतरचे तास.
लेखिका : सलमा
अनुवाद : सोनाली नवांगुळ
या कादंबरीतील राबिया, रहीमा, जोहरा,
अमीना, खदीजा, फिरदौस, फरीदा, नुराम्मा आणि
अशा आणखी कितीतरी स्त्रिया त्यांच्या खासगी
पुरुषसत्ताक जगात छोटी–छोटी विद्रोहाची
निशाणी फडकवतात, नाना तडजोडी करतात...
मैतत्री जुळते, भंगते, घरं एकत्र येतात दुभंगतात...
पण या सगळ्यांच्या नकळत धिमेपणानं
बदल घडत राहतात... बायकांची आयुष्य बदलून जातात.
सलमाची काव्यात्म, सरळसाधी भाषा मुस्लिम
स्त्रियांच्या कौटुंबिक जगण्यातली व्यस्तता,
जटिलता आणि धुसमट परिणामकपणे मांडते.
तमिळनाडूमधील बायकांनी तोंड उघडणंच मान्य नसणार्या रूढीप्रिय आणि बंदिस्त समाजात
१९६८ मध्ये सलमाचा जन्म झाला. तिचा
पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला तेव्हा हा
परंपरावादी समाज हादरला सलमा व आणखी
तीन कवयित्रींवर अश्लील व बीभत्स लेखनाचा
आरोप झाला, त्यांना धमक्या दिल्या गेल्या.
तामिळनाडूतील तिरूचिरापल्ली या जिल्हयाच्या
तिरूवनकुरिची ग्राममपंचायतची सरपंच म्हणून
सलमाने काम केलं. राज्याच्या समाज कल्याण
मंडळाची अध्यक्ष म्हणून काम करण्याचीही
संधी तिला मिळाली आहे. राजकारणात सक्रीय
सहभाग नोंदवलेल्या लेखिकेची ही पहिलीच
कादंबरी तिला आंतराष्ट्रीय ख्याती देवून गेली.
भारतीय प्रादेशिक भाषांमधील बंडखोर लेखिकांचा परिचय मराठी साहित्य विश्वाला करून देण्यासाठी मनोविकासने कविता महाजन यांच्या संपादकीय मार्गदर्शनाखाली एक प्रकल्प हाती घेतला होता. त्याचाच एक भाग म्हणजे प्रसिद्ध तमिळ बंडखोर लेखिका व कवयित्री सलमा लिखित "द अवर पास्ट मिडनाईट‘ ही कादंबरी आहे.
सलमा यांच्या म्हणण्यानुसार ""हे जग म्हणजे कोणा एकाची किंवा पुरुषांची खासगी मालमत्ता नव्हे. लाखो नव्हे, तर कोट्यवधी महिला पुरुषांबरोबर याच जगात त्यांच्या बरोबरीने सुख-दुःख अनुभवत संकटांचा सामना करत जगत असतात. साहजिकच माझ्या साहित्यातून व्यक्त होणाऱ्या व्यथा-वेदना या माझ्या व्यक्तिगत व्यथा-वेदना म्हणून पाहिल्या जाऊ नयेत.‘‘
पारंपरिक आयुष्याचे धीटपणे परीक्षण करून स्त्रीविषयक दृष्टिकोनातून त्याबाबत निग्रही मांडणी तमिळ काव्यामध्ये निर्माण करण्याचे श्रेय सलमाकडे जाते. अशा सलमाची ओळख आता या कादंबरीची सोनाली नवांगुळ यांनी केलेल्या अनुवादामुळे मराठी वाचकांना झाली आहे. साहित्य अकादमीचा यंदाचा पुरस्कार या अनुवादीत कादंबरीला जाहिर झालाय यानिमित्त सोनाली नवांगुळ यांचे अभिनंदन.
सौ.मनिषा राजन कडव.
फोटो स्त्रोत गुगल -
छान लिहिले .💐💐💐
ReplyDelete