Posts

Showing posts from November, 2021

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी - ही श्रींची इच्छा"

Image
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी - ही श्रींची इच्छा"          "ही श्रींची इच्छा" न वाचलेले खूपच कमी वाचक असावेत. सर्वकाही गमावल्यानंतर परत जिद्दीने ते मिळवण्याची अद्भुत आणि प्रेरणादायी कथा असलेलं ठाणेदार यांचं हे नवीन आत्मचरित्र  -ही श्रींची इच्छा, पुन्हा श्रीगणेशा उद्योजक, रसायन शास्त्र तज्ज्ञ हे त्यापुढचंच एक पाऊल आहे. बेळगावला बाराव्या वर्षी एका डॉक्टरांकडे शंभर रुपये महिना पगाराची नोकरी ते १४०० कोटी डॉलर्स उलाढाल असलेल्या बिझनेस उभा करणं, आर्थिक मंदीत तो गमावणं आणि पुनश्च हरिओम करत तो पुन्हा फिनिक्ससारखी राखेतून भरारी घेऊन उभा करणं असा त्यांचा प्रवास सामान्य माणसाला अचंबित करणारा पण प्रत्येक उद्योजकाला इंस्पायर करणारा आहे. वडील रिटायर झालेले अन बहिणींची नुकतीच लग्न झाली असल्याने घरात आर्थिक परिस्थिती बेताची होती.श्री तरुण भारत मध्ये छोटे मोठे लेख लिहीत होता पण अजून पैशांची गरज असल्याने एका डॉक्टरांची "नोकर पाहिजे" म्हणून जाहिरात बघितली आणि तिथं जाऊन धडकला.तिथं मिळणारे पैसे भाजी, किराणा यासाठी वापरत आणि कुणी ओळखीचं भेटू नये याची तो दक्षता घेई, क...

प्रेरणादायी :- आमचा बाप आन् आम्ही..

Image
प्रेरणादायी :- आमचा बाप आन् आम्ही.. २०१ आवृत्त्या निघालेलं! मराठीतील सर्वाधिक खपाचे पुस्तक!आमचा बाप आणि आम्ही! प्रत्येकाने वाचावे आणि संग्रही ठेवावे असे प्रेरणादायी पुस्तक! अस्मिता जागी झाल्यावर काय परिणाम होतो याचा शोध यातून लागतो! डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून किती बदल घडतो हे सांगणारे पुस्तक. सुप्रसिद्ध अर्थतज्ञ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा राज्यसभेचे विद्यमान सदस्य खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांचं हे आत्मचरित्र. दलित समाजातील एखादा व्यक्ती जेव्हा उच्चपदांपर्यंत पोहोचतो आणि त्याचं सर्वस्वी श्रेय तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देतो, तेव्हा खरंच त्या व्यक्तीबद्दल असलेला आदर तर वाढतोच; तथापि, बाबासाहेबांवरील निष्ठाही अधिक बळकट होते. अर्थातच, पुस्तकाच्या नावात वापरलेला "बाप" हा शब्द कोणाला उद्देशून आलाय, हे वेगळे सांगायला नको. पुस्तकाबद्दल बोलायचं झालं तर डॉ.आंबेडकर यांच्यामुळे अस्मिता जागृत झालेल्या एका कुटुंबाची ही कहाणी आहे.  मुंबईस्थित वडाळा येथील बी.पी.टी. (बॉम्बे पोर्ट ट्रस्ट) च्या चाळीतून लेखकाचा प्रवास सुरू झाला. त्यांचे मूळ गाव...