खरा ग्रंथपाल
बुलडाणा येथील प्रसिद्ध साहित्यिक, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य उपाध्यक्ष, निवेदक व प्रख्यात सूत्रसंचालक , भारत विद्यालयाचे ग्रंथपाल नरेंद्र लांजेवार सर (५३) यांचे आज, १३ फेब्रुवारीला दीर्घकालीन आजाराने निधन झाले.
आपल्या लेखणीतून सतत काहीना काही लिहिणारे लेखक, मार्गदर्शक आणि बुलडाणा जिल्ह्याचे गौरव ‘नरेंद्र लांजेवार यांचा जन्म ११ मे १९६८ ला झाला. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी पत्रकारितेची पदवी पूर्ण केली. व्यवसायाने बुलडाणा येथील भारत विद्यालयात ग्रंथपाल असेलेल नरेंद्र लांजेवार यांनी अनेक ग्रंथलेखन केले आहेत. त्यामध्ये अभिव्यक्तीचे क्षितिजे, वाचू आनंदे मिळवू परमानंदे, बुलडाणा जिल्हा साहित्य दर्शन, शेतकऱ्यांच्या आत्महत्या: चिंता आणि चिंतन,, कथांकुर अशी अनेक पुस्तके लेखन केली आहेत. याशिवाय २०० प्रासंगिक तथा वाङ्मयीन लेख लिहिले आहेत. दै.देशोन्नती., दै. लोकमत, दै. मराठवाडा, दै. तरुण भारत, दै. नवराष्ट्र, दै. सकाळ यासंह आत्मभान, महाराष्ट्र यांसारख्या साप्ताहिक मध्ये तसेच दिवाळी अंकात त्यांचे लेख प्रकाशित झालेले आहेत. नरेंद्र लांजेवार यांनी आकाशवाणी च्या जळगाव केंद्रावरून विविध कार्यक्रमांचे प्रसारण तथा ‘उगवतीचे रंग’, ‘बालवाडी’, ‘पुस्तक परिचय’, ‘पालक-बालक’, ‘साल आणि उकल’, ‘पाऊलखुणा’ इ,सदरांचे लेखन केले आहे.
नरेंद्र लांजेवार सर यांनी फक्त लेखनच नाही तर सर्वाना वाचनाची आवड लागावी. लहान मुलांना या डिजिटल युगात पुस्तक वाचण्यासाठी आणि आवड निर्माण होण्यासाठी बुलडाणा शहरात ५० पुस्तक्मैत्री बाल वाचनालयांची उभारण्याचे कार्य केले आहे. शिवाय नरेंद्र लांजेवार सर हे व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे मुख्य संयोजक म्हणून कार्य केले. आपल्या लेखणीने जिल्हावासियांवर ठसा उमटवणारे नरेंद्र लांजेवार सरांना पत्रकारितेच्या तथा वाचन-लिखाणाच्या क्षेत्रातील विभागीय तथा राज्यस्तरावरील विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
सार्वजनिक वाचनालये आणि शालेय वाचनालये सक्षम होऊन वाचन संस्कृती वाढविण्यासाठी , ग्रंथालय चळवळ अधिक सक्षम व्हावी याकरिता नरेंद्र लांजेवार सरांनी राज्यभर प्रेरणादायी काम केले.सोबतच आपल्या लेखनातून अनेकांना ऊर्जा दिली.
अनेक लेखक,ग्रंथपाल,शिक्षक,पालक,
विद्यार्थी यांचे ते मार्गदर्शक होते.त्यांच्यासोबत काम करीत असतांना नेहमीच नवीन अनुभव मिळत असे.त्यांच्या आकस्मिक जाण्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात व ग्रंथालय चळवळीत पोकळी निर्माण झाली आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली.
सौ.मनिषा राजन कडव .
भावपूर्ण श्रध्दांजली
ReplyDeleteहा आपला लेख संग्राह्य आणि त्यांच्या कारकिर्दीवर उत्तम प्रकाश टाकणारा आहे.
ReplyDelete