डिजिटल व व्हर्च्युअल ग्रंथालयांमधील फायदे व तोटे*

*डिजिटल व व्हर्च्युअल ग्रंथालयांमधील  फायदे व तोटे*

ई-बुकचा शोध लावणारे ६४ वर्षीय मायकल हार्ट यांनी पुस्तके जनतेपर्यत मोफत पोहोचवण्याचे  स्वप्न पाहिले होते . त्यानंतर ४ जुलै १९७१ रोजी हार्ट यांनी ई-बुकचा शोध लावला  आज हार्ट या जगात नाहीत . पण लाखो लोक ई-बुकचा वापर करीत आहेत . यातूनच  डिजिटल व व्हर्चुअल ग्रंथालयांची सुरुवात अनेक ठिकाणी झाली  तर जाणून घेऊया त्यांचे फायदे आणि तोटे.

डिजिटल ग्रंथालय (Digital Library) : डिजिटल ग्रंथालय म्हणजे सुसंघटित इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रलेख संग्रह होय. हा संग्रह इंटरनेट, ऑनलाईन अथवा ऑफलाईन स्वरूपात (इ-पब्लिकेशन्स , इ-बुक्स, इ-नियतकालिके इत्यादी) साठवून ठेवलेला माहिती संग्रह होय. डिजिटल ग्रंथालय हे डिजिटल माहिती साधनांशी निगडित असून या ग्रंथालयात माहिती संग्रहण, माहिती शोध व माहितीचे संप्रेषण यासाठी माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. थोडक्यात, डिजिटल ग्रंथालये म्हणजे डिजिटल माहितीची साठवण व

प्रतिप्राप्तीचे विस्तारीकरण होय. डिजिटल माध्यमातील डेटा (टेक्स्ट, प्रतिमा, ध्वनी, चलचित्रे, ॲनिमेशन इत्यादी) जो नेटवर्क प्रणालीवर उपलब्ध होऊ शकताे. 

*डिजिटल ग्रंथालयाचे फायदे : -*

 १) वाचकांना वाचन साहित्य व माहिती प्राप्त करण्याकरिता भौगोलिक मर्यादा येत नाहीत.

२) सर्व वाचन साहित्य २४ × ७ × ३६५ उपलब्ध होतात. थोडक्यात, वेळेची मर्यादा येत नाही. ३) एकाच वेळेस अनेक वाचक एकच डिजिटल ग्रंथ अनेक ठिकाणाहून प्राप्त करू व वाचू शकतात. ४) वाचन साधनांची सुसंघटीतपणे साठवण केलेली असते व त्याचा उपयोग कोणत्याही दुव्यामार्फत (Through Link) करता येतो. ५)अतिशय जलदपणे माहिती प्रतिप्राप्ती होते. ६) दुर्मीळ स्वरूपाच्या माहिती साधनांचे जतन व संवर्धन करता येते. ७) कमीत कमी जागेत जास्तीत जास्त माहिती साठवता येते.

*डिजिटल ग्रंथालयाचे तोटे : -*

१) कॉपीराईट कायद्याचे बऱ्याच वेळेस उल्लंघन होण्याची शक्यता असते.२)  सुरुवातीच्या काळात डिजिटल ग्रंथालये निर्माण करणे खर्चिक असते.३) तंत्रज्ञानात सातत्याने बदल होत असल्याने ठरावीक काळानंतर नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे लागते. यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करावी लागते.

*व्हर्च्युअल ग्रंथालय (Virtual Library) :*

एक अथवा अनेक संगणक प्रणाली आणि नेटवर्कवर असलेले डिजिटल वाचन साहित्य म्हणजे व्हर्च्युअल ग्रंथालय होय. व्हर्च्युअल ग्रंथालयामार्फत बहुविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय डिजिटल वाचन साहित्य व सेवा दूरवरच्या

स्थानाहूनही प्राप्त करता येतात.व्हर्च्युअल ग्रंथालये ही माहिती संप्रेषण संकल्पनेवर आधारित आहेत. यातील माहिती जगातील विविध नेटवर्क्सच्या आधारे शोधता येते. संगणक  नेटवर्क्सच्या आधारे व इंटरनेटचा वापर करून माहितीची प्रतिप्राप्ती करता येते.

*व्हर्च्युअल ग्रंथालयाचे फायदे :-*


 १) जागेची बचत होते. २) विविध स्वरूपात माहितीचा शोध घेता येतो. ३) कोणत्याही स्थानाहून डिजिटल वाचन साहित्य प्राप्त करता येते. ४) इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या डिजिटल वाचन साहित्याचाही समावेश व्हर्च्युअल ग्रंथालयात होतो. ५) डिजिटल मजकूर (Text) सुलभतेने डाऊनलोड करता येतो व हव्या त्या स्वरूपात उपलब्ध होतो. ६) एका वेळेस अनेक वाचक त्यावरील डिजिटल वाचन साहित्य प्राप्त करू शकतात.

*व्हर्च्युअल ग्रंथालयाचे तोटे-*

 : १) प्रत्येक वाचन साहित्यास स्वतंत्र उपयोजक (User Interface) असतो. २) वाचकांना प्रत्येक माहिती उत्पादनांचा (Information Products), डेटाबेसचा लॉग-इन व पासवर्ड लक्षात ठेवावा लागतो. ३) बरेचदा, माहिती डाऊनलोड व मुद्रित करण्यात अडचणी येतात. ४) सर्वच वाचन साहित्य हे डिजिटल स्वरूपात उपलब्ध नसते.५) व्हर्च्युअल ग्रंथालये ही विद्युत पुरवठ्याच्या साहाय्याने व संगणक जाळ्यांच्या आधारे कार्य करत असतात. यात अडथळे येऊ शकतात. यावरून लक्षात येते की .
तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी पुस्तकांशिवाय पर्याय नाही.
आणि ग्रंथालये ही सामाजिक दृष्टिकोनातून अत्यावश्यक बाब असून त्यांच्याशिवाय व्यक्तिगत जीवनात व पर्यायाने सामाजिक जीवनात सकारात्मक परिणाम घडून येणार नाहीत. कारण विकास व शैक्षणिक प्रगती तसेच व्यक्तिमत्त्व विकासात ग्रंथालये महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात. यामुळे देशाची प्रगती आपोआपच साधली जाईल. म्हणूनच देशाची प्रगती होण्याकरिता ग्रंथालयांच्या साहाय्याने ज्ञानाधिष्ठित समाजाची निर्मिती होणे गरजेचे आहे .

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*