Posts

Showing posts from March, 2022

जीवनमुल्यांचे शिक्षण देणारे - "वॉल्डन"

Image
जीवनमुल्यांचे शिक्षण देणारे - "वॉल्डन" निसर्ग आणि मानवी मूल्यांची नैतिक ढासळण होत असलेल्या काळात थोरोचे विचार आपणा सर्वांचे पथदर्शक ठरणारे आहेत. २०१७ हे या आधुनिक ऋषीचं २०० व जन्मशताब्दी वर्ष! देश-काल-भाषा-संस्कृती अशा नानाविध घटकांनी विभागाला गेला असला तरी मानवाचे मानव्य हे एकच आहे या अद्वैत विचाराचे आधुनिक रूप आपल्याला थोरोत सापडते. आधुनिक जगातील मानवी मनाचा निसर्गाप्रत असणारा हुंकार जसा आपल्याकडे तुकोबांनी मांडला तसाच तिकडे थोरोने! गांधीजींची "साधी राहणी आणि उच्च विचारसरणी" घडवण्यात थोरोचा हात मोठा आहे.  एकांत अनुभवायला म्हणून ऐन तारुण्यात हा माणूस वॉल्डन या तळ्याकाठी राहायला गेला आणि त्या २ वर्षांच्या एकांतात त्याला शांततेने दिलेला दृष्टांत त्याच्या 'वॉल्डन' या श्रेष्ठ साहित्य कृतीतून आपल्यासमोर आजही उभा आहे. इंग्लिश समाजात शेक्सपिअर किन्वा डिकिन्स, मराठीत जसे ज्ञानोबा-तुकोबा तसाच अमेरिकेत थोरो, एक आधुनिक ऋषी! मरणाचा उत्सव साजरा करता आला पाहिजे, असं हेन्री डेव्हिड थोरोला वाटायचं. मृत्यूबाबत थोरोची मतं चिंतनीय होती. त्याच्या मते तेव्हापर्यंत अ...

जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स... १६५ वर्ष कलेचा साक्षीदार !!

Image
जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स... १६५ वर्ष कलेचा साक्षीदार !! फोटो स्त्रोत गुगल. मुंबई: भारतातल्या नामवंत आर्ट्स स्कूल्सपैकी विद्यार्थ्यांच्या सर्वात आवडीचं आणि प्रथम पसंतीचं आर्ट कॉलेज म्हणजे 'जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स'. ड्रॉइंग, पेंटिंग, शिल्पकला अशा विविध प्रकारच्या कलांची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचं एकच स्वप्न असतं ते म्हणजे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये ऍडमिशन मिळवणं. इथे ऍडमिशन घेण्यासाठी जगभरातून विद्यार्थी येत असतात. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सनं आजपर्यंत अनेक मोठे कलाकार भारताला दिले आहेत. या कलाकारांच्या अगदी सुरुवातीपासून तर प्रसिद्ध कलाकार होण्यापर्यन्तच्या प्रवासाचं साक्षीदार जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स आहे. फक्त कलाकारच नाही तर काही राजकारणी व्यक्ति, व्यंगचित्रकार, अभिनेते हे देखील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्येच शिकले आहेत. आज जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स तब्बल १६५ वर्ष पूर्ण करत आहे. भारतातील एक सुप्रसिद्ध कलाशिक्षणसंस्था. तिची १८५७ मध्ये मुंबईत स्थापना झाली. सर जमशेटजी जीजीभॉय (१७८३-१८५९) यांनी या स्थापनेसाठी पुढाकार घेतल्यामुळे त्यांचे नाव या संस्थेशी जोडले गेले. सर जमशेट...