जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स... १६५ वर्ष कलेचा साक्षीदार !!
जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स... १६५ वर्ष कलेचा साक्षीदार !!
फोटो स्त्रोत गुगल.
मुंबई: भारतातल्या नामवंत आर्ट्स स्कूल्सपैकी विद्यार्थ्यांच्या सर्वात आवडीचं आणि प्रथम पसंतीचं आर्ट कॉलेज म्हणजे 'जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स'. ड्रॉइंग, पेंटिंग, शिल्पकला अशा विविध प्रकारच्या कलांची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचं एकच स्वप्न असतं ते म्हणजे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये ऍडमिशन मिळवणं. इथे ऍडमिशन घेण्यासाठी जगभरातून विद्यार्थी येत असतात. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सनं आजपर्यंत अनेक मोठे कलाकार भारताला दिले आहेत. या कलाकारांच्या अगदी सुरुवातीपासून तर प्रसिद्ध कलाकार होण्यापर्यन्तच्या प्रवासाचं साक्षीदार जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स आहे. फक्त कलाकारच नाही तर काही राजकारणी व्यक्ति, व्यंगचित्रकार, अभिनेते हे देखील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्येच शिकले आहेत. आज जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स तब्बल १६५ वर्ष पूर्ण करत आहे.
भारतातील एक सुप्रसिद्ध कलाशिक्षणसंस्था. तिची १८५७ मध्ये मुंबईत स्थापना झाली. सर जमशेटजी जीजीभॉय (१७८३-१८५९) यांनी या स्थापनेसाठी पुढाकार घेतल्यामुळे त्यांचे नाव या संस्थेशी जोडले गेले. सर जमशेटजी हे ‘बोर्ड ऑफ एज्युकेशन’ (१८४०) व लंडनच्या हाइड पार्कमधील कला प्रदर्शन (१८५१) या दोन्हींचे सन्माननीय सदस्य होते. त्यांनी लंडनमध्ये जगभरातून आलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन पाहिले. व्यापाराच्या निमित्ताने ते चीनमध्येही जात होते. तेथील कारागिरी, व्यवसाय व व्यापार पाहून त्यांच्या मनात कलाशिक्षण देणारे कलाविदयालय मुंबईतही असावे, ही कल्पना दृढमूल झाली. तिला चेन्नई येथील तंत्र-निकेतनच्या विदयार्थ्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन साहाय्यभूत ठरले (१८५२). त्याचे प्रवर्तक डॉ. हंटर यांनी द टेलिगाफ अँड कुरिअर ऑफ बॉम्बे या वृत्तपत्रात (१८५२) लेख लिहून अशी कलाशाळा मुंबईतही असावी, त्यासाठी सर जमशेटजी जीजीभॉय व जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट (१८०३-१८६५) यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. जगन्नाथ शंकरशेट परिणामतः सर जमशेटजी जीजीभॉय यांनी एक लाख रूपयांच्या देणगीसोबत ही कल्पना तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड फॉकलंड यांच्यापुढे ९ मे १८५३ च्या पत्राव्दारे मांडली. त्यानंतर मुंबईचे काही प्रतिष्ठित नागरिक व काही ब्रिटिश अधिकारी यांनी २२ ऑगस्ट १८५४ रोजी जमशेटजींच्या पत्रावर विचार करून योजना सादर करण्यासाठी सर डब्ल्यू. यार्डले (तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती, मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. सर जमशेटजी जीजीभॉय व सर सी. आर्. एम्. जॅक्सन हे या समितीचे उपाध्यक्ष होते. याशिवाय या समितीत दहा सदस्य असून त्यांतील हिंदी नागरिकांत विनायक वासुदेव, जगन्नाथ शंकरशेट, मागबा (महंमद इबाहीम), फामजी कासवजी, विनायक गंगाधर शास्त्री यांचा समावेश होता. या समितीने नऊ महिने विचारविनिमय करून ८ जून १८५५ रोजी आपला अहवाल सादर केला. अखेर ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट अँन्ड इंडस्ट्री’ची २ मार्च १८५७ स्थापना झाली. उद्योजक असलेले 'सर जमसेटजी जिजेभॉय' यांच्या नावावर आर्ट्स स्कूलला नाव देण्यात आलं. १८५७ -- या आर्ट्स स्कूलचा पहिला वर्ग 'एलफिस्टन इंस्टीट्यूटला घेण्यात आला. १८६५ -- 'जॉन ग्रीफित्स' हे या आर्ट्स स्कूलचे मुख्याध्यापक झाले. १८६६ -- या आर्ट्स स्कूलचे सगळे सूत्र भारत सरकारनं स्वत:कडे घेतले. १८७८ -- जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सला नवीन ईमारत मिळाली. १८७९ -- आर्ट्स स्कूलमध्ये ड्रॉइंगचे क्लास सुरू करण्यात आले. १८९३ -- शिक्षकांसाठी ड्रॉइंगचं ट्रेनिंग इथे सुरू करण्यात आलं. १९०० -- जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये 'आर्किटेक्चर' विभागची स्थपना झाली. १९३५ -- 'हेड ऑफ स्कूल' ऐवजी 'डायरेक्टर' असं मुख्याध्यापकांना संबोधलं जाऊ लागलं. १९३७ -- एम. आर. आचरेकर हे आर्ट्स स्कूलचे 'डेप्युटी डायरेक्टर' झाले. १९४३ -- आर्ट्स स्कूलचे 'व्हि. एस. अदूरकर' हे पहिले भारतीय डायरेक्टर ठरले. १९५८ -- जे जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये 'आर्किटेक्चर' आणि 'कला' असे दोन विभाग करण्यात आले. १९८१ -- जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सला मुंबई यूनिवर्सिटीशी संलग्न करण्यात आलं.
यानंतर आजपर्यंत जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सनं शेकडो हरहुन्नरी कलाकार संपूर्णं जगाला दिले आहेत.
जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे काही हिरे: 'एम. एफ. हुसेन'-- प्रसिद्ध चित्रकार आणि पेंटर 'दादासाहेब फाळके'-- दिग्दर्शक 'अमोल पालेकर'-- अभिनेते 'नाना पाटेकर'-- अभिनेते, 'राज ठाकरे'-- मनसेचे अध्यक्ष 'नितीन देसाई'-- दिग्दर्शक आणि निर्माते 'वामन केंद्रें , व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे'-,सामना अगदी आजच्या तारखेपर्यंत जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स विद्यार्थ्यांचे सर्व स्वप्न पूर्ण करण्यात यशस्वी ठरत आहे. नक्कीच जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचा १६५ वर्षांचा प्रवास सर्वांसाठीच खूप अभिमानास्पद आहे.
सौ.मनिषा राजन कडव
छान माहिती दिलीत , शुभेच्छा
ReplyDeleteखुपच छान माहिती, अभिनंदन मॅडम
ReplyDeleteखूपच सुंदर लिहिले आहे आपल्या कलेच्या विश्वामध्ये आपल्याला घडवणाऱ्या कॉलेज विश्वाचे
ReplyDelete