जीवन काव्य*

*जीवन काव्य*
मानवी भावभावनांचे
वेगवेगळे भावविश्व
उलगडतात फक्त
काव्याच्या अंतरंगात
कधी ओघळतात
दुःखाचे अश्रू
कधी साठवतात
सुखाच्या आठवणी
कधी उलघडत जाते कविता
सुखाच्या हिंदोळ्यावर तर कधी
घसरते ती दुःखाच्या लहरींवर
या अनोख्या भावनांच्या विश्वात
तरिही धागे जुळत जातात
वेगवेगळ्या नात्यांचे
कधी स्वप्नांच्या दुनियेत विहरतात
तर कधी सत्याच्या दुनियेत जागवतात
यातूनही गवसते एक नविन काव्य


सौ.मनिषा राजन कडव

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*