Posts

Showing posts from June, 2022

जादूई जंगला'ची अद्भुतरम्य सफर

Image
जादूई जंगला'ची अद्भुतरम्य सफर  उस्मानाबादचे समाधान शिकेतोड हे एक उपक्रमशील शिक्षक आणि सर्जनशील लेखक आहेत. यापूर्वी त्यांचे 'माझा विद्यार्थी' आणि 'पोपटाची पार्टी' हे दोन बालकवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. बालकुमारांसाठी त्यांची 'जादूई जंगल' ही कादंबरी राजहंस प्रकाशनाने नुकतीच प्रकाशित केली आहे. ह्या कलाकृतीत मुक्त असे कल्पनारंजन आणि कल्पनाविलास आहे.  हे जादूई जंगल विविध प्रकारच्या झाडाझुडपांनी नटलेले आहे. विविध प्रकारचे पशुपक्षी हीच ह्या कथेतील प्रमुख पात्रे आहेत. पशुपक्षी हे ह्या कथेत नायक आहे आणि माणूस नावाचा विनाशकारी प्राणी इथे खलनायक आहे.  सिंह हा ह्या जंगलाचा राजा आहे. ह्या जादूई जंगलात सर्व पशुपक्षी आनंदाने नांदत आहेत. इथल्या सशाला जादू करता येते. तो जादूने आपले रंग बदलतो, तसेच माकडांचेही रंग बदलून टाकतो. जिराफांच्या माना आखूड करून टाकतो. वाघोबांची गुहाच गायब करून टाकतो. इतरांची फजिती पाहून ससोबा मनात हसत असतो. जादूच्या जोरावर आपणच ह्या जंगलाचा राजा बनावे, असे सशाला वाटत असते. जंगलात घडणाऱ्या चमत्कारांचा शोध घेण्याची जबाबदारी कोल्होबाला देण...

पुरेशा उजेडात नसलेली 'मेड इन इंडिया'

Image
पुरेशा उजेडात नसलेली 'मेड इन इंडिया' पु. ल. देशपांडे 'मेड इन इंडिया' या कादंबरीबद्दल असं म्हणाले होते: गेल्या कित्येक वर्षांत अशी हसविणारी आणि तितकीच अस्वस्थ, अंतर्मुख करणारी कादंबरी मी वाचली नव्हती. 'मेड इन इंडिया'तील विनोद हा अंतिम सत्याकडे नेणारा परिपक्व 'शॉर्टकट' आहे. आजच्या सुशिक्षित तरुणाची नेमकी शोकांतिका आणि विदारक कोंडी या कादंबरीतून अतिशय प्रगल्भपणे मांडली गेली आहे. वऱ्हाडी बोलीबरोबरच काव्यात्म, वृत्तपत्रीय, राजकीय आणि चिंतनशील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाषेचा वापर या लेखनात अतिशय खुबीने केला गेला आहे. बोलीभाषा, ग्रांथिक मराठी, हिंदी, इंग्रजी यांच्या मिश्रणातून लेखकाने एक वेगळीच भाषा निर्मिली आहे. या रसायनाचा भाषातज्ज्ञांनी गांभीर्याने अभ्यास केला पाहिजे. कारण ही नव्या पिढीची भाषा आहे. आधुनिक ग्रामीण-शहरी जीवनाचे एवढ्या समर्थपणे केलेले चित्रण मराठीत दुसरे नाही. मराठीत 'मैलाचा दगड' ठरावी अशी ताकद या कादंबरीत आहे. या कादंबरीने मला खूप हसविले आणि तितकेच डोळ्यांत पाणी यावे असे अस्वस्थही केले. मी मनात जपलेल्या मोजक्या पुस्तकांपैक...