कवितेच्या पारंब्या' प्राचार्य डॉ. यशवंत पाटील सरांचा 'कवितेच्या पारंब्या' हा कवितासंग्रह हातात आला. मोठ्या उत्सुकतेनेच हा कवितासंग्रह मी हाती घेतला कारण प्रा. यशवंत पाटील सर हे एक ज्येष्ठ साहित्यिक आहेत. एक अनुभव संपन्न असे व्यक्तिमत्व आहे. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेक संस्थांशी त्यांचा सक्रिय सहभाग आहे. त्यामुळे त्यांचे अनुभव विश्व फार मोठे आहे. या विशाल अनुभवाच्या पटावर जे जे उमटले असेल त्याचे पडसाद त्यांच्या संग्रहात नक्कीच प्रतिबिंबित होणार या उत्सुकतेनेच मी हा कवितासंग्रह हातात घेतला. संवेदना प्रकाशनाने प्रकाशित केलेला हा कवितासंग्रह वाचण्याआधीच 'कवितेच्या पारंब्या' या नावातच तो वाचकाला प्रथम आकर्षित करतो. वटवृक्षाच्या पारंब्यांप्रमाणेच हा कवितारुपी भावभावनांचा शब्दझुला पाहुनच आपल्याला मनातल्या मनात झुलायला लावणारे हे सुंदर शिर्षक वाटते ! या संग्रहाला प्रसिध्द कवी संजय चौधरी यांची सुंदर प्रस्तावना लाभली आहे तसेच ख्यातनाम कवी आणि गीतकार प्रकाश होळकर यांनी या काव्यसंग्रहाची पाठराखण केली आहे. सरांच्या कविता खरोखरच काळजातल्या कविता आहेत. त्या वाचकास समजायला खूपच सहज, सोप्या आणि काळजाला भिडणाऱ्या आहेत. त्यांच्या कवितेत विषयांची खूप विविधता आहे. त्यांच्या जीवनातील प्रगाढ अनुभव आणि सामाजिक जीवनशैलीतून साकारलेल्या अनुभुतींचे प्रतिबिंब या कवितांमधून प्रकर्षाने उमटलेले दिसते ! एखाद्या विस्तीर्ण सरोवरात जिकडे-तिकडे सुंदर कमलपुष्प उमलेली दिसावीत आणि वाचकाने भुंगा होऊन सगळीकडे आस्वाद घेत गुंजारावे असा हा विचारपुष्पांचा पट सरांनी या काव्यसंग्रहात रसिकांसमोर मांडला आहे ! मुळात कवी हे स्वतः आधी एक हाडाचे शिक्षक आहेत. त्यामुळे लेखनातील त्यांची भूमिका आधी एका शिक्षकाची राहिली आहे. ते सुरुवातीलाच आपल्या मनोगतात आपली भूमिका व्यक्त करतात की, " कवीची भूमिका ही मनोरंजन, आत्ममग्नता, कल्पनारम्यता यापेक्षाही वास्तवावर बोट ठेवणारी असावी, प्रबोधनकारी असावी." सरांच्या कविता या नक्कीच प्रबोधनकारी अन् आशयगर्भ अशाच आहेत. मात्र यात त्यांनी कवितेचे रचना स्वरुपाचे रुढ मापदंडही ठोकरलेले असल्याचे वाचकास वाटू शकते. त्यांची धाटणी ही मुक्तपणे आपली विचारसुमने उधळीत रहाण्याची आहे. मुक्त संवादी आहे ! ते आपल्या मनोगतातच सांगून टाकतात की, "कवितांच्या प्रचलित काटेकोर कसोट्या, चौकटी असतात; त्यांचं उल्लंघन काही ठिकाणी झालं असल्याचं मान्य करतो." यातच सर्व आले. सरांनी आपल्या 'कवितेच्या पारंब्या' या शिर्षकाखालील आपल्या पहिल्याच कवितेत कवितेसंबंधीचा आपला दृष्टिकोन मांडला आहे.कविता निद्रिस्ताला उठवते, उठलेल्याला बसवते lबसलेल्याला उभी करते, त्याला धावायला शिकवते llतसेच...नसतो फापटपसारा, उगाच शब्दांचा फुलोरा lतमाम वांड्ग्मय प्रकारात, कविताच ठरते श्रेष्ठ llया संग्रहात सर्व विषयांना स्पर्श करणाऱ्या कविता आहेत. प्रेम, संसार या विषयावरही बऱ्याचशा रचना आहेत. आपल्या प्रेमकवितांमधून ते आपला अंतरीचा उमाळा कसा प्रकट करतात बघा...काटा रूतला तिच्या गोऱ्या पायीदुष्यंत झाला माझा त्या क्षणी आपल्या 'भाळणं अन् सांभाळणं ' या रचनेत ते म्हणतात... भाळण्यानंतरच सांभाळण्याचा प्रवास सुरु होतो lभाळणं क्षणिक, सांभाळणं दीर्घ आयुष्यभर llकवी आपल्या कवितेतून वाचकाला काही तरी संदेश देऊ इच्छितात. आपल्या 'मेंढ्यांचा कळप' या रचनेत ते काय म्हणतात बघा...हुरळलेल्या 'बेभान' मेंढ्यांचा कळप lलबाड लांडग्याप्रमाणे अंधपणे धावू लागला llसद्सद्विवेक, चिकित्सा हरवून बसला llप्रवाहपतित होऊन गाऊ, धावू लागला llमहिलांविषयीच्या लोकांच्या बेगडी प्रवृत्तीवर ते कसे ताशेरे ओढतात पहा.'एका दिवसापुरता उत्सव' या शिर्षकाच्या कवितेत ते लिहितात...तूच आदिशक्ती, रणरागिणी lजिजाऊ अन् झाशीवाली मर्दानी llसावित्रीबाई अन् ताराराणी lद्रौपदीचे वस्रहरण करणारे आम्ही ll आपल्या 'मन वासरू अन् फुलपाखरू' या रचनेत मनाविषयी लिहितात...मन हे सप्तरंगी भिरभिरतं फुलपाखरू lजसं दावं तुटलेलं ओढाळ वासरू llगुंतायलाही नाही लागत काळ-वेळ lअन् तुटायलाही नाही लागत वेळ-काळ llकवीची प्रवृत्ती अध्यात्मिक असली तरीही ते 'शाहू-फुले-आंबेडकर' यांचा विचार विसरत नाहीत. त्यांच्या आचार-विचारांचा पुरस्कार व्हावा, असा ते आग्रह धरतात.'घडवूया...' या आपल्या रचनेत ते हा विचार केवळ तोंडदेखले वापरणाऱ्यांच्या बेगडी प्रवृत्तीवर बोट ठेवतांना दिसतात...शाहू-फुले-आंबेडकर जपतो पावलोपावली lआचार-विचारांचा ठावठिकाणा नाही llउक्ती आणि कृतीत अंतर दोन धृवांचे lशब्दांचेच माणिकमोती उधळत रहायचे llकवीला आपला भोवताल विसरुन चालत नाही. त्यातील विसंगती, वाईट प्रवृत्ती यांनी तो नेहमीच अस्वस्थ होतो. टिपकागदाप्रमाणे त्या टिपत रहातो. आपल्या 'भ्रष्टाचाराचा डीएनए' या कवितेत ते म्हणतात...अनधिकृत कामे, त्याचे परवाने lदिवसाढवळ्या, राजरोस खिसे भरणे ll महात्मा गांधी हा कवीच्या चिंतनाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. महात्मा गांधी शतकातील महात्मा होय. त्यांच्या 'महात्मा गांधी मरत नाही', 'गांधी विचार', 'विवादग्रस्त गांधी', अशा विविध रचनांमधून त्यांनी गांधीजींच्या विचारांचा व व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतला आहे.सत्ता येईल, सत्ता जाईलगांधी कायम जिवंत राहतो'हत्या देहाची, नव्हे विचारांची', आकाशाएवढे बापू' या रचनांमधून त्यांनी गांधी विचारांचा वेध घेतला आहे."जीवनावर भरभरुन प्रेम करणारी, मांगल्याचा सतत ध्यास घेणारी व उदात्त विचार करणारी भारलेली कविता" असे कवी संजय चौधरी यांनी आपल्या प्रस्तावनेत जे वर्णन केले आहे ते अगदी यथार्थ असेच आहे! त्यांनीच असेही म्हटले आहे की, "नैतिकतेची आणि संस्काराची वीण असलेली कविता" सरांनी लिहिली आहे. "जीवनावर प्रेम करणारा हा कवी आहे. जगणं सुंदर व्हावं याचा ध्यास घेतलेला आणि आनंद निर्माण करण्यावर विश्वास असलेला हा कवी आहे, हा नितळ मनाचा पारदर्शक कवी आहे." आपलं जगणं सुसह्य कसं होईल याची प्रश्नोत्तरे शोधणारा हा कवी आहे. 'असंतोषाची पडलीच एखादी ठिणगीतर वाचेल कोण सांत्वणासाठी'असा सजगतेचा नम्र इशारा द्यायलाही ते कचरत नाहीत.म्हणूनच त्यांची प्रबोधनकारी भूमिका खूप प्रेरणादायी वाटते.स्वार्थी माणसे संगतीला अन् पंगतीलाघेऊन दुःखी होऊ नका, कारणकाटेरी झुडपेच केळीची पाने टरटरानिकटच्या सहवासाने फाडतात, चिरतात llअशी ही सरळसोट साधी सोपी रचना असणारी कोणत्याही रसिक वाचकाला सहज समजेल अशी, परंतु काळजाला हात घालणारी प्रबोधनकारी रचना म्हणजेच 'कवितेच्या पारंब्या' हा अनमोल विचारपुष्पांचा खजिना होय ! बस्स !! रसिकांना प्रत्यक्ष कवितासंग्रह वाचण्यासाठी ऊर्जा देणारी ही एवढी ओळख पुरेशी आहे. रसिक वाचक निश्चितच या काव्यसंग्रहाचे स्वागत करतील आणि या कविता त्यांना पारंबीवर झुलायला लावतील अशाच आहेत.सौ.मनिषा राजन कडव

l


    प्राचार्य डॉ. यशवंत पाटील सरांचा 'कवितेच्या पारंब्या' हा कवितासंग्रह हातात आला. मोठ्या उत्सुकतेनेच हा कवितासंग्रह मी हाती घेतला कारण प्रा. यशवंत पाटील सर हे एक ज्येष्ठ साहित्यिक आहेत. एक अनुभव संपन्न असे व्यक्तिमत्व आहे. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेक संस्थांशी त्यांचा सक्रिय सहभाग आहे. त्यामुळे त्यांचे अनुभव विश्व फार मोठे आहे. या विशाल अनुभवाच्या पटावर जे जे उमटले असेल त्याचे पडसाद त्यांच्या संग्रहात नक्कीच प्रतिबिंबित होणार या उत्सुकतेनेच मी हा कवितासंग्रह हातात घेतला. 
   संवेदना प्रकाशनाने प्रकाशित केलेला हा कवितासंग्रह वाचण्याआधीच 'कवितेच्या पारंब्या' या नावातच तो वाचकाला प्रथम आकर्षित करतो. वटवृक्षाच्या पारंब्यांप्रमाणेच हा कवितारुपी भावभावनांचा शब्दझुला पाहुनच आपल्याला मनातल्या मनात झुलायला लावणारे हे सुंदर शिर्षक वाटते ! या संग्रहाला प्रसिध्द कवी संजय चौधरी यांची सुंदर प्रस्तावना लाभली आहे तसेच ख्यातनाम कवी आणि गीतकार प्रकाश होळकर यांनी या काव्यसंग्रहाची पाठराखण केली आहे. 
    सरांच्या कविता खरोखरच काळजातल्या कविता आहेत. त्या वाचकास समजायला खूपच सहज, सोप्या आणि काळजाला भिडणाऱ्या आहेत. त्यांच्या कवितेत विषयांची खूप विविधता आहे. त्यांच्या जीवनातील प्रगाढ अनुभव आणि सामाजिक जीवनशैलीतून साकारलेल्या अनुभुतींचे प्रतिबिंब या कवितांमधून प्रकर्षाने उमटलेले दिसते ! एखाद्या विस्तीर्ण सरोवरात जिकडे-तिकडे सुंदर कमलपुष्प उमलेली दिसावीत आणि वाचकाने भुंगा होऊन सगळीकडे आस्वाद घेत गुंजारावे असा हा विचारपुष्पांचा पट सरांनी या काव्यसंग्रहात रसिकांसमोर मांडला आहे ! 
      मुळात कवी हे स्वतः आधी एक हाडाचे शिक्षक आहेत. त्यामुळे लेखनातील त्यांची भूमिका आधी एका शिक्षकाची राहिली आहे. ते सुरुवातीलाच आपल्या मनोगतात आपली भूमिका व्यक्त करतात की, " कवीची भूमिका ही मनोरंजन, आत्ममग्नता, कल्पनारम्यता यापेक्षाही वास्तवावर बोट ठेवणारी असावी, प्रबोधनकारी असावी."
   सरांच्या कविता या नक्कीच प्रबोधनकारी अन् आशयगर्भ अशाच आहेत. मात्र यात त्यांनी कवितेचे रचना स्वरुपाचे रुढ मापदंडही ठोकरलेले असल्याचे वाचकास वाटू शकते. त्यांची धाटणी ही मुक्तपणे आपली विचारसुमने उधळीत रहाण्याची आहे. मुक्त संवादी आहे ! ते आपल्या मनोगतातच सांगून टाकतात की, "कवितांच्या प्रचलित काटेकोर कसोट्या, चौकटी असतात; त्यांचं उल्लंघन काही ठिकाणी झालं असल्याचं मान्य करतो." यातच सर्व आले. 
    सरांनी आपल्या 'कवितेच्या पारंब्या' या शिर्षकाखालील आपल्या पहिल्याच कवितेत कवितेसंबंधीचा आपला दृष्टिकोन मांडला आहे.

कविता निद्रिस्ताला उठवते, उठलेल्याला बसवते l
बसलेल्याला उभी करते, त्याला धावायला शिकवते ll

तसेच...

नसतो फापटपसारा, उगाच शब्दांचा फुलोरा l
तमाम वांड्ग्मय प्रकारात, कविताच ठरते श्रेष्ठ ll

या संग्रहात सर्व विषयांना स्पर्श करणाऱ्या कविता आहेत. प्रेम, संसार या विषयावरही बऱ्याचशा रचना आहेत. आपल्या प्रेमकवितांमधून ते आपला अंतरीचा उमाळा कसा प्रकट करतात बघा...

काटा रूतला तिच्या गोऱ्या पायी
दुष्यंत झाला माझा त्या क्षणी

 आपल्या 'भाळणं अन् सांभाळणं ' या रचनेत ते म्हणतात...
 
भाळण्यानंतरच सांभाळण्याचा प्रवास सुरु होतो l
भाळणं क्षणिक, सांभाळणं दीर्घ आयुष्यभर ll

कवी आपल्या कवितेतून वाचकाला काही तरी संदेश देऊ इच्छितात. 
आपल्या 'मेंढ्यांचा कळप' या रचनेत ते काय म्हणतात बघा...

हुरळलेल्या 'बेभान' मेंढ्यांचा कळप l
लबाड लांडग्याप्रमाणे अंधपणे धावू लागला ll
सद्सद्विवेक, चिकित्सा हरवून बसला ll
प्रवाहपतित होऊन गाऊ, धावू लागला ll

महिलांविषयीच्या लोकांच्या बेगडी प्रवृत्तीवर ते कसे ताशेरे ओढतात पहा.
'एका दिवसापुरता उत्सव' या शिर्षकाच्या कवितेत ते लिहितात...

तूच आदिशक्ती, रणरागिणी l
जिजाऊ अन् झाशीवाली मर्दानी ll
सावित्रीबाई अन् ताराराणी l
द्रौपदीचे वस्रहरण करणारे आम्ही ll
 
आपल्या 'मन वासरू अन् फुलपाखरू' या रचनेत मनाविषयी लिहितात...

मन हे सप्तरंगी भिरभिरतं फुलपाखरू l
जसं दावं तुटलेलं ओढाळ वासरू ll
गुंतायलाही नाही लागत काळ-वेळ l
अन् तुटायलाही नाही लागत वेळ-काळ ll

कवीची प्रवृत्ती अध्यात्मिक असली तरीही ते 'शाहू-फुले-आंबेडकर' यांचा विचार विसरत नाहीत. त्यांच्या आचार-विचारांचा पुरस्कार व्हावा, असा ते आग्रह धरतात.
'घडवूया...' या आपल्या रचनेत ते हा विचार केवळ तोंडदेखले वापरणाऱ्यांच्या बेगडी प्रवृत्तीवर बोट ठेवतांना दिसतात...

शाहू-फुले-आंबेडकर जपतो पावलोपावली l
आचार-विचारांचा ठावठिकाणा नाही ll
उक्ती आणि कृतीत अंतर दोन धृवांचे l
शब्दांचेच माणिकमोती उधळत रहायचे ll

कवीला आपला भोवताल विसरुन चालत नाही. त्यातील विसंगती, वाईट प्रवृत्ती यांनी तो नेहमीच अस्वस्थ होतो. टिपकागदाप्रमाणे त्या टिपत रहातो. आपल्या 'भ्रष्टाचाराचा डीएनए' या कवितेत ते म्हणतात...

अनधिकृत कामे, त्याचे परवाने l
दिवसाढवळ्या, राजरोस खिसे भरणे ll
 
 महात्मा गांधी हा कवीच्या चिंतनाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. महात्मा गांधी शतकातील महात्मा होय. त्यांच्या 'महात्मा गांधी मरत नाही', 'गांधी विचार', 'विवादग्रस्त गांधी', अशा विविध रचनांमधून त्यांनी गांधीजींच्या विचारांचा व व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतला आहे.

सत्ता येईल, सत्ता जाईल
गांधी कायम जिवंत राहतो

'हत्या देहाची, नव्हे विचारांची', आकाशाएवढे बापू' या रचनांमधून त्यांनी गांधी विचारांचा वेध घेतला आहे.

"जीवनावर भरभरुन प्रेम करणारी, मांगल्याचा सतत ध्यास घेणारी व उदात्त विचार करणारी भारलेली कविता" असे कवी संजय चौधरी यांनी आपल्या प्रस्तावनेत जे वर्णन केले आहे ते अगदी यथार्थ असेच आहे! त्यांनीच असेही म्हटले आहे की, "नैतिकतेची आणि संस्काराची वीण असलेली कविता" सरांनी लिहिली आहे. "जीवनावर प्रेम करणारा हा कवी आहे. जगणं सुंदर व्हावं याचा ध्यास घेतलेला आणि आनंद निर्माण करण्यावर विश्वास असलेला हा कवी आहे, हा नितळ मनाचा पारदर्शक कवी आहे."   
आपलं जगणं सुसह्य कसं होईल याची प्रश्नोत्तरे शोधणारा हा कवी आहे. 
'असंतोषाची पडलीच एखादी ठिणगी
तर वाचेल कोण सांत्वणासाठी'
असा सजगतेचा नम्र इशारा द्यायलाही ते कचरत नाहीत.
म्हणूनच त्यांची प्रबोधनकारी भूमिका खूप प्रेरणादायी वाटते.

स्वार्थी माणसे संगतीला अन् पंगतीला
घेऊन दुःखी होऊ नका, कारण
काटेरी झुडपेच केळीची पाने टरटरा
निकटच्या सहवासाने फाडतात, चिरतात ll

अशी ही सरळसोट साधी सोपी रचना असणारी कोणत्याही रसिक वाचकाला सहज समजेल अशी, परंतु काळजाला हात घालणारी प्रबोधनकारी रचना म्हणजेच 'कवितेच्या पारंब्या' हा अनमोल विचारपुष्पांचा खजिना होय ! बस्स !! 

     रसिकांना प्रत्यक्ष कवितासंग्रह वाचण्यासाठी ऊर्जा देणारी ही एवढी ओळख पुरेशी आहे. रसिक वाचक  निश्चितच या काव्यसंग्रहाचे स्वागत करतील आणि या कविता त्यांना पारंबीवर झुलायला लावतील अशाच आहेत.





सौ.मनिषा राजन कडव

Comments