आले बेडूकराव
आले बेडूकराव,आले बेडूकराव
डराव डराव करून यांनी
भरला सगळ्यांना दम
काय तर म्हणे आज पासुन मी तुमचा चेअरमन
आजपासून इथे
मीच सांगेल ते होईल
हाजी हाजी करेल माझी
तोच पुढे जाईल
आजपासून तुम्ही करा
तयार दही आणि लोणी
सभा घेऊन सगळ्याची मीच खाईन फक्त
खाणार नाही कोणी
अरेरावी फक्त इथे
चालेल फक्त माझी
हुशार लोक चालत नाहीत मला
हवीत हवी फक्त करणारी हाजी
तुमच्यावर हुकूमत
चालवून मी स्वार होईन
जास्तच चालवले कोणी डोके
तर त्याला बघून घेईन
कुत्र्यासारखे शेपूट घालून
तुम्ही मिटींगला बसायचे
मी टाॅमी म्हणताच तुम्ही
काॅय काॅय करून शेपूट हलवायचे
निर्बुध्द लोकांच्या नगरीचा
मी आहे राजा
मी असताना कशी
सुखी होईल माझी प्रजा
- या कवितेचा कुठल्याही वास्तविकतेशी संबंध नाही
सौ.मनिषा राजन कडव
कल्याण
Comments
Post a Comment