वाळू

वाळूवर काढत नक्षी
ती लाट किनारी आली
मी स्तब्ध उभी काठावर
आठवांची वर्दळ झाली !

देहाची नाजूक सळसळ
करते माडाची झावळी
मत्त समीर धसमुसळा 
टाकतो विस्कटून सावली ! 

पैलतीरावर लाटेवरती 
डचमळताना दिसते थोडी
घेऊन इशारे सुकाणूचे 
कुठे निघाली आहे होडी ! 

केशर क्षितीजावर झुलती
बगळ्यांच्या मोहनमाळा
संध्येचा सागरकाठी 
घडे मावळतीचा सोहळा !


सौ.मनिषा राजन कडव.

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*