टाळ बोले मृदूंग बोले

*टाळ बोले मृदुंग बोले*


कापसाला बोंड आली
कापूस आला 
वात झाली
ज्योत पेटली,प्रकाश झाला
प्रकाशात ज्योतीच्या
जीव आतला झेपावला ॥१॥

नाही सुट्का तुझी रे
आता माझा दिस आला
पहाटेच्या काकड्याला
टाळ बोले मृदुंगाला
कळा लावा अनंताला
अनंताच्या प्रवासात
विठुचाच बोलबाला ॥२॥

आतल्या खोबणीत 
पुन्हा कुणी कण्हावला
जावे आता म्हणतो
कान्ह्याच्या भेटीला
वर वर रागरंग 
आत आत्मा कातावला
नाद ब्रम्हा तार लावला ॥३॥

भौतिकाच्या नादाने
आड आला मनपावा
वाट चुकवुन अद्वैताची
भुलला पुन्हा सुरावटीला ॥४॥



सौ.मनिषा राजन कडव

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*