प्रेम मिलाप
प्रेम मिलाप
तुझ्याच पायी तुझ्याच सवे
पाहिले मी मम ऱूप नवे
ध्यास तुझा श्वास माझा
हरवून बसले मी कशी रे सख्या
आगंतुक तु कोठुन आला
मज लागला तुझाच लळा
ह्रदयात शिरला तु अन
झाला सगळाच घोटाळा
मम लागेना काहिच गोड
लागली बस तुझीच ओढ
फिरते वेड्या मीरा वानी मी
अन दिसतो सगळीकडे तू
दिसतो सर्वत्र तू चित्तचकोर
काय करावे या मनमंदिराला
जिथे ठाकला तुझाच वास
आळविते तुझला हि राधा
एकदा तरी तु समोर ये
माझ्या तू अन मिटव
हा कायमचा प्रेम मिलाप
Comments
Post a Comment