जगण्याची जिद्द

जगण्याची जिद्द-



एकाकी वाळवंटात
उगवले एक रोपटे
कोणीही सोबत नसताना
वार्‍यावर डोले बापुढे॥१॥॥

कंटाळा यैत नसेल का त्याला
एकटे असे राहताना
आनंद कसा मिळत असेल
वृक्ष जिवन जगताना॥२॥॥

कुणीही न सखा
कुणी न संग सोबती
गप्प उभे हे 
स्तब्ध जागेवरती॥३॥॥

विचारले मी त्या रोपाला
जिव तुझ्यात कोठूनी आला
तडकलेल्या जमिनी मध्ये
जिव तुला कसा नावरला॥४॥

दूरवर चोहीकडे बघता
थेंब न एकही पाण्याचा
ना दिसले जीवन कोठे
वाळवंट होता पसरलेला॥५॥

प्रश्नार्थक नजर पाहून
रोपटे तयावर उद्गारला
अंकुरीत केले दैवाने
जगण्याचा मोह मज होता॥७॥

जीवन एक संघर्ष आहे
तो सुटला न कोणाला
जिद्द उरी बाळगूनी
जगण्याचा जणु नशाच चढला॥८॥

तहान भागवण्या धरतीची
होईल मी ही एक कल्पवृक्ष
जेव्हा येई माणसांला समज
जीवन होईल मरणापरी सहज॥६॥




सौ.मनिषा राजन कडव

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*