बगळा
बगळा
एकदा एका तळ्यात
शिरला एक बगळा
होता तो रंगानै
आगळा आणि वेगळा
येऊन बाता मारल्या
मी करेन तळ्याचा विकास
तळ्याचा मोरक्याही होता
डोक्यानै भकास
विश्वास ठेवला यावर
जाणून न घेता
हातातून काढून दिली
त्याच्या हातात सत्ता
मदार्याच्या माकडा सारखी
तर्हा झाली त्याची
काठी उगारून बगळा म्हणेल तसं
कर आता ढँची ढँची
तेल गेल तूप गेल
हाती इलं धुपाटणं
रौज मरे त्याला कोण रडे
हेच नेहमीच रडगाणं
विकासाच्या नावावर
बगळा मेद खाई
तळ्यातल्या प्राण्यांंचे मात्र
रोज हाल होई
एकाच्यातही नव्हते
धारिष्ट बोलण्याचे
एकजुटीनै पुन्हा
चांगले दिवस आणण्याचे
रोज एक एक करून
प्राणी येथील संपतील
बगळा काम झाल्यावर
बगळ्याचे मात्र अशाने सुगीचे दिवस येतील
बगळ्याचं म्हणण एकच नरा आता सगळे
जगू नका कोणी
मी मात्र बसून खाईन
तुमच्या टाळूवरचं लोणी
सौ.मनिषा राजन कडव
कल्याण
Comments
Post a Comment