मुरली
*मुरली*
नको नको राधे करू ,माझा बाई असा हेवा ।
मीही सखी मुकूंदाची ,तुझ -माझा नाही दावा ।।
असशील गोकुळीची, लाडकी ग गौळण तू
वेडावते माझ्या स्वरे,सारे गोकुळ परंतू ।।
सौदर्याने तुझ्या बाई ,भुलविसी गिरीधर .
परी माझ्या नादापायी ,उभे डोले चराचर ।।
हरि अधारांचे बाई , तुझे-माझे एक सुख
परि माझ्या येते कानी , त्याच्या अंतरीची हांक ।।
कधी व्याकूळसी राधे , विरहात जळसी तू
वचनाने कटिबध्द ,मीच कान्ह्याशी परंतू। ।।
सैरावैरा धावतात,हरिपायी गवळणी
धुंडतात परी स्वर , कुठे येतो माझ्या कानी ।।
राधे जाईल गोकुळ , आणि गौळण गोधन
यमुनेच्या काठी परी, राहिल ग माझी धून. ।।
Comments
Post a Comment