पुर्नजन्म

*पुनर्जन्म*


वेड मला जडले ग 
काट्यांतून हसण्याचे
सुकलेल्या पुष्पांतुन
पुन: पुन: फुलण्याचे


मेंदीचा लाल रंग
खुलवितसे अंग अंग
परंतु ती जळीतसे 
मनिचा अंतरंग


हांसत ये ऋतू वसंत 
उधळीत ये मधु सुगंध 
ग्रीष्मातील तप्त ऊन
फुलवितसे मम जीवन


केतकीच्या मधु सुगंध
दरवळतो आसमंत
मला मात्र डोलवितो
मस्त - सुस्त तो भुजंग


विझलेल्या राखेतून 
पेटते अग्निशिखा
ज्वालेच्या तेजातून 
मज मिळते संजीवनी


वेड आहे मजसि खुळे
असण्यातील नसण्याचे
मृत्यूची ओढ मला
देत असे पुनर्जन्म 



सौ.मनिषा राजन कडव.

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*