आरसा
आरसा
तुझे माझे असे कधी , नाही करत आरसा ।
मनी भाव तसे रूप , दाखवितो आरसा ।।
कुणी उभे पुढे जरी , सत्य बोले आरसा ।
पोटी एक ओठी दुजे , दावितसे आरसा ।।
भले बुरे उणे काय , सांगतसे आरसा ।
दोष नको जाण गुण , बोलतसे आरसा ।।
झाले कसे घाव मनी , शोधतसे आरसा ।
चित्त जाळी देह कसा , जाणतसे आरसा ।।
सत्य मुळी सोडु नको , बजावतो आरसा ।
खोटे अंगी बाणु नको , बोधतसे आरसा ।।
बाल युवा वृद्ध सारे , पाहतोच आरसा ।
काल जसा तसा नाही , टोकतसे आरसा ।।
आले किती गेले किती , तिथेच आहे आरसा ।
जीव नाही तरी भाव , जाणतोच आरसा ।।
स्वर्गी गेले प्रिय किती , पाणावतो आरसा ।
मोक्ष मला मिळे कधी , विचारतो आरसा ।।
सौ.मनिषा राजन कडव.
Comments
Post a Comment