गांधी का मरत नाही
गांधी का मरत नाही ?' चौकटीत न मावणारा गांधी समजून घेतांना....
दोन ऑक्टोबर हा दिवस महात्मा गांधी जयंती म्हणून आपण सर्वजण साजरा करतो. या साजरे करण्यात कार्यालयीन, शासकीय सोपस्काराचा गंध अधिक असतो. बाकी 'महात्मे' वेगवेगळ्या जातीने वाटून घेतले. ह्या इत जातीच्या चौकटीत म.गांधी बसू शकले नाही. कम्युनिस्ट, आंबेडकरी, आरएसएस हे वैचारिक टोक असलेल्या चळवळीतील अभ्यासकांनी, माणसांनी संघ गांधींना कधी जवळ केले नाही. अगदी गांधीवाद्यांनी गांधीना नीट समजून कर घेतलेलं दिसत नाही. तरीही शासकीय कार्यालयाच्या भिंतीवरील गांधीजींच्या बो फोटोची अपरिहार्यता टाळता आली नाही. विचार पुसता आले नाहीत. या देऊ पार्श्वभूमीवर अलीकडे रावसाहेब कसबे यांचे 'गांधी पराभूत राजकारणी 'आणि विजयी महात्मे' जगदीश कदम यांचे 'गांधी समजून घेतांना' ही वि पुस्तकं गांधी विचाराची नव्याने मांडणी करतात. ह्यात चंद्रकांत वानखडे लिखित 'गांधी का मरत नाही' हे पुस्तकही वेगळ्या मांडणीने लक्षात राहिलं. आरंभी पुस्तकाचे शीर्षक पाहून हा माणूस गांधींना मेल्यावरही मारायला का उठला ? हा प्रश्न मनाला अस्वस्थ करून गेला, पण मलपृष्ठावरील तल विनोबाजींचे विश्लेषण ही शंका दूर करण्यास पुरेसी ठरली. लेखकाच्या 'आपुलाचि वाद आपणासी' या आत्मकथनातून शालेय अनुभव व्यक्त इल करतांना गांधीजींच्या विषयीचा श्रद्धाभाव यापूर्वी वाचनात येऊन गेला. घडणीच्या वयातच जाणीवपूर्वक गांधी- सावरकर हे द्वंद्व शिक्षकाकडून रंगविले गेल्याने नायक-खलनायकाची भावना बळावत गेली. माझं तुझं ही नाव दरी रुंदावत गेली. परिणामी देशमुखीस्तव त्याग, समर्पण व निस्वार्थी आचरण करणाऱ्या महात्म्याचे विचारकार्य 'थोर' होण्याऐवजी 'तोकडे' कसे बनू शकतात, हा प्रश्न 'गांधी का मरत नाही' या पुस्तकाच्या पानोपानी ओसंडून वाहतांना दिसतो.
मुळात वैश्विक पातळीवर भारत हा तथागत गौतमबुद्ध व महात्मा गांधी यांच्या अहिंसात्मक तत्वज्ञानाने सुपरिचित आहे. परदेशात आपले राष्ट्रीय नेतेही अभिमानाने तथा नाइलाजाने या महापुरुषांचे स्मरण करून अहिंसेच्या थोर भावना व्यक्त करतात. परंतु 'घर की मुर्गी, दाल बराबर' या लोकप्रिय म्हणीप्रमाणे काही प्रवृत्ती या महापुरुषांचा दुःसाहस करून त्यांना एक संपविण्यापर्यंत कशी मजल मारू शकतात, याचा खरमरीत समाचार लेखक वि घेतांना दिसतो. स्वातंत्र्याची उगवती पहाट पाहण्यात अनेक क्रांतिकारक, उ लहानथोरांचे योगदान राहत आले आहे. या स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधीजींचे योगदान कुणीही नाकारू शकत नाही. 'राष्ट्रपिता' या उपाधीला साजेसा नैतिक अधिकार त्यांचा होता. महात्मा गांधी स्वातंत्र्य आंदोलनासह सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, लष्करी, राजकीय व धार्मिक परिवर्तनाची लढाई देखील तेवढ्याच सक्षमपणे उभी करतात. एवढा अफाट पसारा उभा करतांना सर्वच काही आलबेल असू शकते, असे कुठेही ते अतिआत्मविश्वासाने म्हणत नाहीत उलट विरोधकांची टीकाही उदारपणे अंगावर घेतात, तिथे कुठेही द्वेषाचे विखारीपण नसते. याचे कितीतरी छोटेमोठे प्रसंग लेखक उभी करतात. शहीद भगतसिंग-सुखदेव राजगुरु फाशी प्रकरण, चौरीचारा प्रकरण, ह पुणे करार, मिठाचा सत्याग्रह, भारत-पाकिस्तान फाळणी या विविध घटनाप्रसंगी विरोधकांनी गांधी विरुद्ध कम्युनिस्ट, गांधी विरुद्ध दलित आंबेडकरी विचारधारा, गांधी विरुद्ध मुस्लिम समाज गांधी विरुद्ध हिंदुत्ववादी असा अंतर्विरोध दर्शवून विरोधकांनी गांधींचा खलनायकी चेहरा प्रकर्षाने समोर आणला. महात्मा गांधी अखंड भारताला शिवू पाहत होते. सर्वहार समाजाच्या उन्नतीचा विचार करत होते. उन्नतीच्या पायवाटेत काही समाजघटक दुखावले गेल्याची शंका नाकारता येत नाही. गांधींनी स्वातंत्र्याची लढाई समर्थपणे पेलली पण सत्तेच्या खुर्चीची फळे ठोकरली. त्यांचा शब्द प्रमाण होता पण त्याग, समर्पण, अपरिग्रह, उपवास, ब्रह्मचर्य व निर्मोहीपणा ही त्यांच्या जगण्याची सुत्री बनली, जात, धर्म, भाषा, प्रांत व राजेशाहीच्या सीमा तोडल्या. चौकटी मोडणारा गांधी प्रस्थापितांना रूचण्याचा विषय नव्हता, म्हणून गांधी विरोधकांच्या नजरेत ब्रिटीशधार्जिणा, हिंदूधार्जिणा, पाकिस्तानी मुस्लिमधार्जिणा, दलितद्रोही, सुभाषबाबूविरोधक, नेहरूचाधर्जिणा अशी कितीतरी टीकेची गरळ ओकणारा ठरला. एवढंच नव्हे तर त्यांच्या वैयक्तिक चारित्र्याची धिंडवडे काढणारी पुस्तके चविष्टपणे बाजारातून मांडली गेली. दुदैवाने या विरोधाला गांधीवादीही परखडपणे प्रतिउत्तर देऊ शकले नाहीत, याची खंत लेखकाला अस्वस्थ करते. चंद्रकांत वानखडे यांनी या पुस्तकातून या विखारी प्रवृतीविरुद्ध सप्रमाण मांडणी करून गांधी 'माणूसधार्जिणा' असल्याचे सिध्द केले. मोहनदास गांधी ते महात्मा गांधी हा सामान्यत्वाकडून असामान्यत्वाकडे जाणारा कष्टदायक प्रवास चंद्रकांत
वानखडे सहजसुलभ शैलीत उभा करतात. महात्मा गांधी स्वतः सनातनी हिंदू म्हणून घेत असले तरी मूर्तीपूजा, कर्मकांड नाकारतात. आंतरजातीय विवाहास स्वतः उपस्थित राहून प्रोत्साहन देतात. प्रचंड दबाव असतांनाही कोचरंब आश्रमात अस्पृश्य जोडप्याला आश्रय देतात. चित्तपावन ब्राह्मणाच्या हातून मेलेल्या ढोराची कातडे सोलण्यास सांगून 'कर्मसंकर' घडवून आणतात. धर्ममार्तंडांनी टिळकांच्या पार्थिवाला विरोध करताच स्वतः खांदा देतातच शिवाय शौकतअलिला खांदा द्यायला सांगून जाती-धर्माची चौकट मोडतात. चांभार वा भंग्याची मुलगी भारताच्या सर्वोच्चपदी बसण्याचे स्वप्न पाहतात. ऐतखाऊ व्यवस्था नाकारून श्रमप्रतिष्ठा
देणारा चरखा उभा करतात. अशी गांधीची कितीतरी रूपे वानखडे यांनी उभी केली आहेत. सर्वार्थाने अजातशत्रू असणाऱ्या गांधींवर देशात, परदेशात अनेकांनी लिहिले, प्रेरणा देणारे पुतळे उभे केले. मदर तेरसा, ओबामा गांधी आयडॉल वाटावा पण हा गांधी कुणाच्या तरी गोळीची शिकार बनावे, हे खूप मोठे दुर्दैव ठरले. देशाच्या राष्ट्रपित्याच्या मारेकऱ्यास देशभक्त म्हणून गौरविले जावे, त्याचं जाहीरपणे उदात्तीकरण केलं जावं, अभिव्यक्त स्वातंत्र्याच्या नावाखाली थिएटरमध्ये गर्दी ओढवून घेणारं ठरावं, ही अस्वस्थता चंद्रकांत वानखडे लपवू शकले नाही. एखाद्या गोळीने कदाचित व्यक्ती आपल्यातून हरवून जाईलही पण विचार ? गांधींच्या जाण्याविषयी विनोबांची बोलकी प्रतिक्रिया या पुस्तकाचे शीर्षक बनून यावी, एवढी थोर. विनोबा म्हणतात, माझ्या मनाला असेच वाटले की, गांधीजींचा मृत्यू झालाच नाही आणि आजपर्यंत माझ्या मनात हाच विचार आहे की ते जिवंत आहेत. सज्जनांचा मृत्यू कधी होत नाही, ते सदाचे जिवंत असतात आणि दुर्जन कधी जिवंत असतच नाहीत, ते फक्त कल्पनेच्या जगात जगत असतात. विनोबांचा हा विचार अस्वस्थ वर्तमानातही ऊर्जा देणारा ठरतो. तुकोबा, महात्मा बसवेश्वर, नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, कलबुर्गी या परंपरेतील भ्याड हल्ले 'व्यक्ती' मारण्यात समाधानी असतील पण विचार मारण्यात हतबल. अशा एका पोकळ अस्वस्थ वर्तमानात बोलक्या मुखपृष्ठासह मनोविकास प्रकाशनने प्रकाशित केलेले चंद्रकांत वानखडे यांचे 'गांधी का मरत नाही' हे पुस्तक सुजान समाज, वाचक, चिंतक व समीक्षकांसाठी पर्वणी ठरेल.
सौ.मनिषा राजन कडव
Comments
Post a Comment