वचनाची आठवण
वचनाची आठवण हा लेख वाचताना नक्कीच होते.
शिक्षकांचे बालकांच्या जीवनातील महत्त्व सांगताना लेखक एक अत्यंत सुंदर वाक्य पेरतात, ‘खरेतर बालकाच्या आयुष्यात येणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना बालक निश्चित करू शकत नाहीत. मात्र त्याच्या आयुष्यातील शिक्षक निवडण्याचे स्वातंत्र्य त्यांच्या पालकांना मात्र निश्चित असते…’ असे सांगताना लेखक शिक्षकाला थेट परीसाची उपमा देतात.
अखिल भारतीय शिक्षण परिषदेचे अधिवेशन नांदेड येथे सुरु असताना एका शिक्षकाचा सत्कार उच्च शिक्षित अधिकारी करतात आणि पटकन त्या शिक्षकाचा पदस्पर्श करतात. उपस्थित लोक आश्चर्याने ती घटना पाहतात. नंतर समजते की, ते शिक्षक त्या दोन्ही अधिकाऱ्यांचे शिक्षक होते. शिक्षकाबद्दलची अशी व्यासपीठावर व्यक्त झालेली कृतज्ञता ही कोणत्याही पुरस्कारापेक्षा मौलिक आहे.
एकंदरीत ‘शिक्षणाचे पसायदान’ हा ग्रंथ वाचनीय, मार्गदर्शन करणारा, मौलिक असा आहे. अत्यंत सोप्या भाषेत अनेकानेक अत्यंत चांगले विचार, सिद्धांत मांडले आहेत. लेखकाचा अभ्यास आणि शिक्षण क्षेत्रासाठीची त्यांची तळमळ जाणवल्याशिवाय राहत नाही. आपले विचार व्यक्त करण्याची त्यांची हातोटी अवर्णनीय अशीच आहे. त्यांच्या या शैक्षिक कार्याला अनंत शुभेच्छा !
सौ.मनिषा राजन कडव
Comments
Post a Comment