छळते ही थंडी मला*
*छळते ही थंडी मला*
ही सळसळणारी थंडी तन जळजळणारी थंडी
तू नसते जेव्हा साथीला मन कळवळणारी थंडी
त्या उंच डोंगरामागुनी जे पिसाट वारे येती अन् स्वप्न गुलाबी देऊनी मन चळवळणारी थंडी
भिरभिरते केस गुलाबी गालावर आली लाली ते सोनपाखरू उडताना मन वळवळणारी थंडी
निवडुंग तुला बघताना छानसा मोगरा झाला बागेत केवडा शेवंती ही दरवळणारी थंडी
प्रारब्ध असे राहू दे ही मिठी सैल ना व्हावी झालेच तरी दुःखाने मन हळहळणारी छळते मला थंडी
सौ.मनिषा राजन कडव
Comments
Post a Comment