तुझी आठवण येते

*तुझी आठवण येते!*


तुझी आठवण येते!
हे हळवेपण;
कळते,सलते, तरी ओघळते,
पानावरुनी अलगद दंव कण!

तुझी आठवण येते!
ही हतबलता;
छळते, गिळते, उरी गलबलते,
कातर वेळा मनांत भरता!

तुझी आठवण येते!
हे आधारीत जगणे;
रुतते, खुपते, मनात सलते, 
नजरेत आपुल्या मरणे!

तुझी आठवण येते!
ऋण जन्माचे;
जपते, फिटते, तरीही उरते
बंधन, भाव मनाचे!

तुझी आठवण येते!
स्निग्ध दिलासा 
देते, भरते, रित्या मनाते 
विश्वास हवा हवासा!



 सौ.मनिषा राजन कडव

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*