वेड करडू
*वेड करडू*
एका जंगलाच्या शेजारी एक सुंदर खेडेगाव होतं जंगलाच्या कडेला लागूनच एक शेतकऱ्याचे कुटुंब वास्तव करत होते या शेतकऱ्यांनी गुराढोरांसोबतच कोंबडी व काही बकऱ्याही पाळल्या होत्या यापैकी एका बकरीने दोन करडूंना जन्म दिला होता .यातील यातील शेळीच एक करडू शांत होतं तर दुसरा फार उपद्व्यापी होता .शेळी नेहमी पिल्लांना सांगत असे ही तुम्ही जंगलाच्या दिशेने कधीच जाऊ नका .इथेच खा तिथेच खेळा शेतकरी शेतावर जाताना नेहमी आपल्या घरासमोरच्या कुरणावर या शेळ्यांना चरण्यासाठी सोडत असे .शेतकऱ्याने पाळलेली ही जनावरे सर्व एकत्र खेळत असत. या शेळीच्या पिल्लांसोबत कुत्र्याची पिल्ले व कोंबडीची पिल्ले खेळत असत. पण शेळीच हे दुसरं बाळ फारच मस्तीखोर होतं सारखं इकडे तिकडे जात असे. शेळी त्याला फार समजावत असे की आजूबाजूला जाऊ नको शत्रू असतात. ते आपल्याला हानी पोहोचवू शकतात. पण तरीही हे पिल्लू ऐकत नसे. त्याला जंगलात जाण्याची जंगल पाहण्याची भारी ओढ होती. झाडावर बसलेले पशुपक्षी झाडावर बसलेले पक्षीही त्याला सांगत असतात की तू आईचा एकच जा एकदा काय झालं हे शेळीचे पिल्लू नजर चुकवून जंगलाच्या दिशेने गेलं झाडावर बसलेला कावळा चिमणी हे सगळे जण त्याला सांगत होते तू जाऊ नको तू इकडे तिकडे जाऊ नको हळूहळू पुढे गेला थोडं अंतर गेल्यावर त्याला एक लांडगा दिसला या पिल्लाला लांडगा आपला शत्रू असतो हे माहीतच नव्हतं हे त्याच्याजवळ गेलं आणि त्याला म्हणाला की इथे चरण्यासाठी कुठे छान जागा आहे मलाही जंगल पाहायचे आहे तुला माहित आहे का या जंगलाबद्दल मला तू दाखवशील का शेळीच्या पिल्लाला पाहून लांडगाच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. तो म्हणाला हो मी तुला दाखवीन तू माझ्यासोबत चल त्यावर पिल्लू म्हणाला हा ठीक आहे. मी येतो तुझ्यासोबत मला दाखव पण पुन्हा मला माझ्या आईकडे आणून सोड शील ना. लांडगा ओठांवर जिभ फिरवत हा चालेल असं म्हणून तो लांडगा त्या पिल्लाला सोबत घेऊन जाऊ लागला व झाडावर बसलेले पैसे पक्षी त्याला धोक्याची सूचना देत होते.त्याला सांगत होते. तूला तुझ्या आईने काय सांगीतल आहे आठव अनोळखी व्यक्तींवर वर भरवसा ठेऊ नकोस.अनोळखी व्यक्ती सोबत तू जाऊ नको . पण या पिल्लाने त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुलक्ष केलं थोडं पुढे अंतर चालून आल्यावर लांडगा पिल्लावर झडप घालण्यासाठी धावून आला पण त्या ते पिल्लू थोडं सावधान असल्यामुळे त्याच्या त्याच्या झडपे पासून लांब पळाले आणि त्याच्या आईने त्याला संरक्षणाचे धडे दिलेले होते ते मात्र त्यांनी व्यवस्थित शिकून घेतलेले होते . त्यामुळे त्या लांडग्याला चकवा देत ते पुढे पुढे पळू लागले झाडावर बसलेले पशुपक्षी त्याला आपल्या आवाजात रस्ता दाखवू लागले. आता पिल्लाला खूप पश्चाताप होत होता लांडगा त्याचा पाठलाग करत होता. पिल्लू जोरजोरात धावत होते. जीवाच्या आकांताने ते घराकडे पळत होते. आता पिल्लाला आईने सांगितलेले सर्व आठवत होते. पण वेळ निघून गेलेली होती. आता त्याला जीव वाचवण्यासाठी जोर जोरात धावणे गरजेचे होते आणि पिल्लाचे नशीब बनवत तर म्हणून ते पिल्लू आपल्या घराकडे परत आले होते लांडग्याची फजिती झालेली होती आणि पिल्लू आपल्या घरी सुखरूप पोहोचले होते .आता पिल्लू आपल्या आईशी भेटले आणि आईला सांगितलं यापुढे मी कधीही अशी चूक करणार नाही तू सांगितलेलं मी नक्की ऐकणार.
सौ. मनिषा राजन कडव
Comments
Post a Comment