नाते युगायुगाचे
*नाते युगायुगांचे*
नाते तुझे नी माझे, सांगू नको कुणाला
या धुंद कस्तुरीचा, अनुमान ना जगाला
नाते तुझे नी माझे, एकाच या क्षणाचे
सामावले तयात, सुख सार जीवनाचे
नाते तुझे नी माझे, आहे युगायुगांचे
त्याला न नाव काही ,या भूतलावरीचे
नाते तुझे नी माझे जणु एक पारिजात
गंधाळल्या क्षणांना मी माळले मनात
नाते तुझे नी माझे, जन्मास ना पुरावे
भोगून भोग सारे, आत्म्यात ते उरावे
सौ. मनिषा राजन कडव
Comments
Post a Comment