एकीच बळ
एकिच बळ
एका गावात एक वडाचं झाड होत. या झाडावर वेगवेगळे पक्षी आपली घरटी बांधून रहात होते. झाड सदानकदा फळांनी बहरलेलं असायचं. त्यामुळे विविध जातीच्रा पक्षांची सारखी रेलचेल असायची.या झाडावर आणि झाडाच्या ढोलीत काही किटक पण रहात असत. झाडावरच्या फळांचा आस्वाद घेत असतं.रस्त्याने येणारे जाणारे वाटसरूही सावलीसाठी येथे झाडाखाली आराम करत असत. या झाडाच्या मुळाशी काही मुंग्यांचे वारूळ होते. मुंग्या फार कष्टकरी होत्या.त्या त्यांच्या वारूळातून शिस्तबध्द पध्दतीने बाहेर येऊन आपल्यासाठी लागणारे दाणे ,खाऊ जमा करत असत व पुन्हा आपल्या वारूळात जात असत. त्या झाडावर एक माकडाचे जोडपे आपल्या लहान पिल्लासह रहात असे. ते माकडाचे पिल्लू फार वात्रट खोडकर होते. त्य्याच नाव होत चिंटू, तो रोज या मुंग्याना जाताना येताना पहात असे. ते पिल्लू स्वतः तर पोट भरण्यासाठी कष्ट घेत नसे. आपल्या आईवडिलांनी आणलेले अन्नच खात असे. पण या मुग्यांची रोजची ये जा अन्न मिळविण्यासाठी चाललेली गम्मत पाहून त्याला त्यांची खोड काढण्याची लहर येत असे. तो इतरांच्याही अशाच खोड्या काढत असे. त्याला असं करण्यात फार गंमत वाटे. त्याची आई त्याला खूप समजावत असे. बाबा त्याला रागवत असत. पण सुधारेल तो चिंटू कसला . बाकीचे पक्षी त्याच्या या खोड्यांकडे दुर्लक्ष करीत.मुंग्या वारूळातून निघून आपल्या अन्नाच्या शोधार्थ जित असताना हा नेहमी त्यातल्या काही मुंग्याना आपल्या हाताने मारत असे. यात काही मुंग्या मरत असत तर काही जखमी होत असत. मुंग्या त्याच्या या खोड्यांना फार वैतागल्या त्यांनी सर्व मुंग्यांची सभा घेतली. त्यात ठरले एकावर हल्ला झाला की सगळ्यांनी एक होऊन मिळून जोरदार हल्ला करायचा समोरच्या शत्रुला पळो की सळो करून सोडायचे. असेच दुसर्या दिवशी अन्न मिळविण्यासाठी मुंग्या जेव्हा वारूळातून बाहेर येऊ लागल्या तेव्हा चिंटूने ते पाहिले आणि तो मुंग्यांना त्रास देण्यासाठी खाली उतलला. शत्रू समोर दिसताच मुंग्याच्या राजाने रणशिंग फुंकले त्याबरोबर सर्व मुंग्यांनी एकजुटीने चिंटूवर हल्ला चढविला . सर्वांनी जोरजोरात चिंटूचा चावा घ्यायला सुरूवात केली. चिंटू वेदनेने कळवळू लागला. जोरजोराने चॅकचॅक करत सैरावैरा पळू लागला. त्याच्या आईने हे पाहिले. तीने धावत येऊन सर्व मुंग्यांची माफी मागीतली व यापुढे चिंटू पुन्हा असा वागणार नाही याची हमी दिली. चिंटूलाही आपली चूक कळली होती. त्यानेही मनापासून माफी मागितली. त्यानंतर त्याने पुन्हा कोणालाही त्रास दिला नाही. झाडावरील सर्व प्राण्यांना पक्ष्यांना एकीच्या बळाचे महत्व दिसून आले होते.
सौ. मनिषा राजन कडव
छान आहे कथा.
ReplyDelete