मनाच्या कोर्या कागदावर
मनाच्या कोर्याच्या कागदावर
लपल्यात युगायुगाच्या आठवणी
शब्दात न सांगता येणारी
मनात दडवलेली गुजगाणी।।१॥
वर्षानुवर्षे लोटतात
कडुगोड अनेक क्षण
काही व्यक्त तर काही अव्यक्त
राहून जातात मनोमन॥२॥
आठवतात गाबुळलेल्या चिंचा खातानाच्या आठवणी
झाडावरून काढताना
कशी झालेली त्वचा केविलवाणी ॥३॥
कापसाच्या म्हातारिच्या मागे
धावताना
ती लागलेली ती टक्कर
आणी आई मारेल म्हणून
आलेली ती चक्कर ॥३॥
अशा कितीगं मनपटलावर
कोरल्या गेल्यात बालपणीच्या
त्या करवंदाच्या जाळीगत
आंबट गोड साठवणी॥४॥
Comments
Post a Comment