मनाच्या कोर्या कागदावर
*मनाच्या कोऱ्या कागदावर*
कोरा कागद कवी मनाचा कोरा कागद जेव्हा रंगतो शब्दांच्या निलाईने अंतरातील उठलेल्या भावनांना उजळवतो आपल्या लेखणीने
घेऊन प्रत्येक क्षणा क्षणांना ओळीच्या कडव्यात जेव्हा रचतो शब्दरूपी वाक्याना अर्थ देऊन काव्याच्या रचनेतून साकारतो
हळूहळू साकारलेल्या रचनेतून नव्या भावनेची काव्यमूर्ती प्रगटते साहित्य वाचतांना आपल्याशी ती बोलते असे मनोमन जाणवते
असा हा कवी मनाचा कोरा कागद रोजच रंगत असतो नव्या रचनेतून न बोलणाऱ्या अंतरातील भावनांना व्यक्त करतो आपल्या शब्द काव्यतून...
सौ. मनिषा राजन कडव
Comments
Post a Comment