बर्म्युडा ट्रॅंगल
*बर्म्युडा ट्रँगल* रहस्यमय त्रिकोणाचा मागोवा जगामध्ये काही रहस्य अशी आहेत की त्यांचा उकल होत नाही. विज्ञानालाही त्यांचं कोडं सोडवता आलं नाही. सागरामध्ये असाच एक प्रदेश आहे बर्म्युडा ट्रँगल. ह्या भागामध्ये अनेक विमाने, जहाजे त्यातील एक हजारपेक्षा जास्त प्रवाशांसह गायब झाली आहेत. ह्या विमानांचे अवशेष मागे सापडले नाहीत, मृत प्रवाशांचे देहही सापडले नाहीत. गायब विमान किंवा जहाजांचा शोध घेणाऱ्या मोहिमा आखल्या गेल्या. शेकडो मैल सागर पिंजून काढला, पण त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. अटलांटिक महासागराच्या पश्चिमेस असलेला हा सागरी प्रदेश अनेक वर्षांपासून एक गूढ बनून राहिला आहे. विजय देवधरांनी लिहिलेल्या 'बर्म्युडा ट्रँगल" पुस्तकात ह्या गूढ सागराचा वेध घेतला आहे. हा भाग सैतानाचा आहे इथपासून ते परग्रहावरील मानव इथून विमाने-जहाजे पळवतात इथपर्यंत शक्यतांची माहिती दिली आहे. मूळ लेखक चार्ल्स बार्लीज असून देवधरांनी अत्यंत सोप्या मराठी भाषेत अनुवाद केला आहे. हे पुस्तक वाचताना आपणही एका रहस्यमय जगात प्रवेश करतो. काही जहाजांवरील फक्त खलाशी गायब झाले, ते जहाज लुटण्याचा प्रयत्न झाला नाही, जहाजावरील ...